Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 18:37 IST

Ghadge & Suun Serial : या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

ठळक मुद्देभाग्यश्रीने 'घाडगे & सून' या मालिकेच्या सेटवरचा एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. यासोबतच तिने लिहिले आहे की, माझ्या आयुष्यातील एक खूप चांगला अध्याय आता संपणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मला दिलेल्या प्रेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 

'घाडगे & सून' या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत चिन्मय उद्गीरकर अक्षयची तर भाग्यश्री लिमये अमृताची भूमिका साकारत आहेत तर माईच्या भूमिकेत सुकन्या कुलकर्णी आहेत. या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या भाग्यश्रीनेच सोशल मीडियाद्वारे सगळ्यांना ही बातमी सांगितली आहे.

भाग्यश्रीने 'घाडगे & सून' या मालिकेच्या सेटवरचा एक फोटो नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला आहे. या फोटोत आपल्याला तिच्या मागच्या बाजूला घाडगे सदन लिहिलेली पाटी पाहायला मिळत आहे. यासोबतच तिने लिहिले आहे की, माझ्या आयुष्यातील एक खूप चांगला अध्याय आता संपणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मला दिलेल्या प्रेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. 

'घाडगे & सून' या मालिकेचे उत्तम कथानक, कलाकार यामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. घाडगे सदन आणि त्यातलं कुटुंब हे प्रेक्षकांना आपल्या कुटुंबाचा एक भाग वाटत होतं. त्याचमुळे या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. घाडगे सदनमधील माई, अण्णा, अक्का, अक्षय, अमृता आणि कियारा या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या. अक्षय-अमृताची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यांच्या केमिस्ट्रीची नेहमीच चर्चा रंगत असे. या मालिकेतील नायक-नायिकाच नव्हे तर खलनायिकांना देखील प्रेक्षकांचे प्रेम मिळाले होते. या मालिकेतील कियारा आणि वसुधा या दोघीही खलनायिका प्रेक्षकांना भावल्या होत्या. 

टॅग्स :घाडगे अँड सूनकलर्स मराठी