Join us

तिसरी घंटा पुन्हा वाजणार! राज्यभरातील नाट्यगृहे ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार; पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 22:57 IST

अखेर ५ नोव्हेंबरपासून राज्यातील नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्यातील नाट्यगृहे ५ नोव्हेंबरपासून सुरू होणारसंबंधित सर्व शासकीय अधिकारी, विभागांना ताबडतोब आदेश

मुंबई: कोरोना संकटामुळे राज्यातील नाट्यगृहे बंद ठेवण्यात आली होती. यामुळे ठाकरे सरकारविरोधात टीका, आंदोलने करण्यात आली. यावरून अनेक कलांकारांनी नाराजी व्यक्त केली होती. कोरोनाची दुसरी लाट बहुतांश प्रमाणात कमी झाल्यानंतर हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स, मॉल्स काही निर्बंधांसह सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नाट्यगृहे सुरू करण्याला परवानगी देण्यात आली नव्हती. अखेर ५ नोव्हेंबरपासून राज्यातील नाट्यगृहे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. (cm uddhav thackeray gave permission to start theater from 5 november with 50 percent capacity) 

सिद्धार्थ चांदेकर म्हणतो, '...हा काळ कधीच विसरू शकणार नाही'

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सदस्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यात यावी, यासाठी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नाट्यगृहे ५ नोव्हेंबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेतला. तसा आदेश संबंधित सर्व शासकीय अधिकारी आणि विभागांना ताबडतोब देण्यात आला आहे. 

काळजावर घाव! बारामतीचा पठ्ठ्या करतोय तरुणींच्या मनावर राज्य

आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनी घेतला पुढाकार

मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष नवनाथ मच्छिन्द्र कांबळी, प्रवक्ते मंगेश कदम, मराठी नाट्यव्यासायिक निर्माता संघाचे अध्यक्ष संतोष भरत काणेकर, रंगमंच कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर वेल्ले, विजय केंकरे, रंगकर्मी आंदोलन प्रतिनिधी विजय राणे उपस्थित होते. आदेश बांदेकर आणि सुबोध भावे यांनी ही भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. या सगळ्यांच्या उपस्थितीत नाट्यगृहे सुरू करण्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. 

चार वर्षांपूर्वीच्या प्रकरणामुळे रकुल प्रीत अडचणीत?; ईडीकडून चौकशी

दरम्यान, यावेळी रंगकर्मीं आंदोलन महाराष्ट्राचे प्रतिनिधी विजय राणे यांनी रंगकर्मीं आंदोलन महाराष्ट्रच्या निवेदनातील मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली महाराष्ट्रातील लोककलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी कोरोना नियमांचे पालन करण्यासंबंधी सुधारीत नियमावली बनवून परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.सरकार दरबारी रंगकर्मींची नोंद करण्यासंदर्भातील माहिती देण्यासाठी सोमवारी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालकांनी रंगकर्मीं प्रतिनिधीना  कार्यालयात बोलावले आहे. फी न भरल्यामुळे रंगकर्मीच्या मुलांना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांची यादी लवकरात लवकर देण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कलाकार पेन्शन योजनेतील उत्पन्नाच्या दाखल्याची अट मर्यादा वाढविण्या विषयी तसेच रंगकर्मीं रोजगार हमी योजने बद्दलही चर्चा झाली. विजय राणे यांनी रंगकर्मींच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले.

 

टॅग्स :नाटकराज्य सरकार