Join us
Daily Top 2Weekly Top 5

काळजाचा ठोका चुकवणारे अ‍ॅक्शन सीन्स अन् बरंच काही! समांथा-वरुण धवनच्या 'सिटाडेल'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 11:40 IST

बहुचर्चित सिटाडेल वेबसीरिजची इंडियन आवृत्ती असलेला 'सिटाडेल हनी बनी'चा ट्रेलर रिलीज झालाय (citadel)

'सिटाडेल' या वेबसीरिजची जगभरात चांगलीच चर्चा आहे. या वेबसीरिजचं स्वतःचं एक फॅन फॉलोईंग आहे. 'सिटाडेल' वेबसीरिजच्या मागील एका आवृत्तीत अभिनेत्री प्रियंका चोप्राने काम केलं होतं. आता पहिल्यांदाच 'सिटाडेल' या गाजलेल्या वेबसीरिजची भारतीय आवृत्ती लवकरच रिलीज होणार आहे. 'सिटाडेल हनी बनी' असं या वेबसीरिजचं नाव असून या वेबसीरिजचा चित्तथरारक ट्रेलर रिलीज झालाय. काळजाचा ठोका चुकवणारे अ‍ॅक्शन सीन्स या वेबसीरिजमधून बघायला मिळणार आहेत. 

'सिटाडेल हनी बनी'चा ट्रेलर

सुरुवातीला 'सिटाडेल हनी बनी'च्या ट्रेलरमध्ये समांथा (हनी) तिच्या मुलीला समजावताना दिसते. ती तिच्या मुलीला एका पेटीत बंद करुन तिच्या कानावर हेडफोन लावते. आणि गुंडांचा सामना करते. पुढे वरुण धवनची (बनी) बाईकवर स्टाईलमध्ये एन्ट्री होते. वरुण समांथाला तिच्या टीममध्ये जॉईन करतो. पुढे हनी - बनी मिळून एका मिशनवर जातात. तिथे मारधाड आणि गुंडांचा सामना करुन हनी-बनी यशस्वी होतात का? हे सीरिज रिलीज झाल्यावरच बघायला मिळेल. 

या तारखेला 'सिटाडेल हनी बनी' होणार रिलीज

'फॅमिली मॅन' फेम राज & DK यांनी 'सिटाडेल हनी बनी'चं दिग्दर्शन केलंय. हॉलिवूडचे रुसो ब्रदर या वेबसीरिजचे Executive प्रोड्यूसर आहेत. 'सिटाडेल हनी बनी'मध्ये वरुण धवन, समांथा प्रमुख भूमिकेत आहेत. तर केके मेनन, साकीब सलीम, शिवांकित परिहार हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. ७ नोव्हेंबरला ही सीरिज प्राईम व्हिडीओवर रिलीज होणार आहेत. ट्रेलर उत्कंठावर्धक असल्याने सर्वांना या वेबसीरिजची उत्सुकता आहे.

टॅग्स :वरूण धवनसमांथा अक्कीनेनीके के मेननसिकंदर खेरप्रियंका चोप्रा