Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: पुन्हा सुरु होतोय CID, एसीपी प्रद्युम्न अन् दयाची पहिली झलक आली समोर; लवकरच प्रोमोही येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 18:00 IST

सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्रामवर ही पहिली झलक पोस्ट करण्यात आली आहे.

टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांचा लाडका शो सीआयडी (CID) आता पुन्हा सुरु होणार आहे. शोची पहिली झलक नुकतीच समोर आली आहे. एसीपी प्रद्युम्नच्या भूमिकेत अभिनेते शिवाजी साटम एकदम स्टाईलमध्ये दिसत आहेत. तर इन्सपेक्टर दयाचीही झलक पाहायला मिळत आहे. तसंच सीआयडीचं आयकॉनिक म्युझिक बॅकग्राऊंडला ऐकू येत आहे.  नुकतंच सोनीने याची पहिली झलक शेअर केली आहे.

सोनी टीव्हीच्या इन्स्टाग्रामवर ही पहिली झलक पोस्ट करण्यात आली आहे. तसंच २६ ऑक्टोबर रोजी सीआयडीचा प्रोमो येणार आहे. सध्या व्हिडिओत झलक पाहायला मिळत आहे ज्यामध्ये पाऊस पडत आहे. तर एसीपी प्रद्युम्न छत्री घेऊन गाडीबाहेर येताना दिसतात. दुसरीकडे दयाचे फक्त डोळे पाहायला मिळतात. एकंदरच प्रोमो काय असणार याची उत्सुकता वाढवली आहे. 

प्रोमो पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 'माझ्या बालपणीचा ऑल टाईम फेवरेट शो','सुपर डुपर एक्सायटेड','ओहह वो क्या था, क्या हुआ, कैसे हुआ, क्यो हुआ?','ब्लॉकबस्टर टीआरपी असणार' अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

सीआयडी शोने तब्बल २० वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. २०१८ साली शोने सर्वांचा निरोप घेतला होता. यानंतर अनेकदा चाहत्यांनी सीआयडी पुन्हा सुरु करा अशी मागणी केली. अखेर सहा वर्षांनी चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होत आहे. 

टॅग्स :सीआयडीशिवाजी साटमटेलिव्हिजन