Join us
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून चित्रांगदाला मिळत नव्हत्या मॉडलिंग असाइनमेंट, अभिनेत्रीचा खुलासा

By गीतांजली | Updated: November 19, 2020 16:27 IST

हजारो ख्वाईशें ऐसी’ या सिनेमातून चित्रांगदा सिंगने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला.

'हजारो ख्वाईशें ऐसी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या चित्रांगदा सिंगचे पहिल्या सिनेमातील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून कौतुक झाले. तिने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. चित्रांगदा सिंह म्हणाली की, आपल्या सावळ्या त्वचेच्या रंगामुळे ती उत्तर भारतात भेदभावाची शिकार झाली होती. तिला मॉडलिंग असाइनमेंटदेखील मिळाली नाही. 

जागरणच्या रिपोर्टनुसार नुकत्याच झालेल्या मुलाखतीत चित्रांगदा सिंग म्हणाली, त्वचेचा रंग बघून भेदभाव केला जातो, मात्र प्रत्येकजण गोरा रंग बघून काम नाही देत.

मुलाखती दरम्यान चित्रांगदा म्हणाली, 'सावळ्या रंगासोबत एक मुलगी म्हणून जगण्याचे महत्त्व मला माहिती आहे. लोक तुमच्या तोंडावर थेट बोलतील असे नाही, तुम्हाला फक्त ते जाणवू शकते.  मी विशेषत: उत्तर भारतात वाढत असताना या प्रकारच्या भेदभावाचा बळी पडले आहे. चित्रांगदा मुंबईत येण्यापूर्वी राजस्थान, उत्तर प्रदेश आणि दिल्लीमध्ये रहात होती.चित्रांगदाला तिच्या  त्वचेच्या रंगामुळे मॉडेलिंगची असाइनमेंट कशी मिळाली नाही हे देखील सांगितले.

चित्रांगदा पुढे म्हणाली, 'मला मॉडेलिंग असाइनमेंटमध्ये घेण्यात आले नाही. माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मला स्पष्टपणे सांगितले गेले होते की मी सावळी आहे. या ऑडिशन दरम्यान गुलजार साहेबांनी मला पाहिले आणि त्यांनी मला त्यांच्या म्युझिक व्हिडिओमध्ये घेतले. तेव्हा मला कळले की प्रत्येकजण रंग बघून काम देत नाही. चित्रांगदा लवकरच एका एक शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. तिने चित्रपटाचे संवाद आणि पटकथा देखील लिहिली आहे.

टॅग्स :चित्रांगदा सिंग