Join us

कॅन्सरच्या वृत्तांवर अखेर चिरंजीवींनी सोडलं मौन, म्हणाले - 'मला...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 17:25 IST

Chiranjeevi : अभिनेता चिरंजीवी कॅन्सरने ग्रस्त असल्याचे वृत्त अलीकडेच आली होती. आता चिरंजीवीने पहिल्यांदाच या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे.

टॉलिवूडचा मेगास्टार चिरंजीवी(Chiranjeevi)ने साऊथसोबतच बॉलिवूड चित्रपटांमध्येही अभिनय करून लोकांना वेड लावले आहे. चिरंजीवी त्यांच्या चित्रपटांव्यतिरिक्त त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असतात. नुकतेच चिरंजीवी यांच्यासंदर्भात एक बातमी समोर आली, जी जाणून घेतल्यानंतर चिरंजीवी यांच्या चाहत्यांना धक्का बसला. चिरंजीवी यांच्या संबंधित बातमीत म्हटले होते की, अभिनेता कॅन्सरने ग्रस्त आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चिरंजीवीने पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत चिरंजीवी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे.

साऊथचे सुप्रसिद्ध स्टार्स चिरंजीवी नुकतेच कॅन्सरच्या बातम्यांमुळे चर्चेत आले. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये चिरंजीवी यांना कॅन्सर झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र उपचारानंतर ते बरे झाले. चिरंजीवी यांनी आता या बातमीबाबत मौन सोडले आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर करून अभिनेत्याने ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे म्हटले आहे.

मला कॅन्सर झाला नाही...

 ते म्हणाले की, 'अनेक मीडिया हाऊसने मला कॅन्सर झाला आणि मी उपचारानंतर बरा झाल्याच्या बातम्या लिहिल्या. यानंतर मला अनेकांचे मेसेज आले. याशिवाय अनेकजण घाबरले. याच्या पुढे चिरंजीवीने लिहिले की, 'मला कॅन्सर झाला नाही, माझ्या नियमित चाचण्या झाल्या आहेत. ज्यामध्ये कॅन्सर नसलेले पॉलीप्स आढळून आले. जे धोकादायक ठरू शकत होते. चिरंजीवीचे हे ट्विट समोर आल्यानंतर अभिनेत्याला कॅन्सर झाल्याची बातमी पूर्णपणे खोटी निघाली. चिरंजीवीच्या या ट्विटनंतर आता चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

या चित्रपटात दिसणार चिरंजीवी

चिरंजीवी 2022 मध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटात दिसले होते. यानंतर चिरंजीवी 'भोला शंकर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात चिरंजीवीसोबत तमन्ना आणि कीर्ती सुरेश देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार आहे. 

टॅग्स :चिरंजीवी