Join us

चिमुकली मायरा अमृतावर करतीये मात; पाहा छोट्या परीच्या 'चंद्रा'वरील अदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 17:33 IST

Myra vaikul: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी ताल धरला. विशेष म्हणजे या गाण्याचा एक ट्रेंड तयार झाला असून हा ट्रेंड चिमुकल्या मायरा वायकुळनेदेखील फॉलो केला आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर केवळ चंद्रा या एकाच नावाची चर्चा सुरु होती. अखेर ही चंद्रा प्रेक्षकांच्या भेटीला आली. अभिनेत्री अमृता खानविलकरची मुख्य भूमिका असलेला चंद्रमुखी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याची सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याला नेटकऱ्यांनी विशेष पसंती दिली होती. त्यातलंच एक गाणं म्हणजे चंद्रा. या गाण्यावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी ताल धरला. विशेष म्हणजे या गाण्याचा एक ट्रेंड तयार झाला असून हा ट्रेंड चिमुकल्या मायरा वायकुळनेदेखील फॉलो केला आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील चिमुकली परी अर्थात बालकलाकार मायरा वायकुळ हिने चंद्रा या गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने हुबेहूब चंद्राप्रमाणेच गेटअप केला आहे. त्यामुळे ती चिमुकली चंद्रा आहे असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला डोक्यावर उचलून घेतलं आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा प्रत्येक ट्रेंड मायरा फॉलो करत असते. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारी मायरा एक लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएंसरदेखील आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

टॅग्स :चंद्रमुखीसिनेमाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार