Join us

"छावाने सिंहासारखी गर्जना केली...", विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यानंतर आयुष्मान खुराणा नि:शब्द

By कोमल खांबे | Updated: February 18, 2025 13:40 IST

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाने 'छावा' सिनेमा पाहिला. विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेता नि:शब्द झाला आहे.

विकी कौशलच्या 'छावा' सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. प्रदर्शित होताच 'छावा'ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. या सिनेमाचे शो हाऊसफूल होत असून 'छावा' पाहण्यासाठीप्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही 'छावा' सिनेमाचं कौतुक केलं आहे. आता बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराणाने 'छावा' सिनेमा पाहिला. विकी कौशलचा सिनेमा पाहिल्यानंतर अभिनेता नि:शब्द झाला आहे. 

'छावा' सिनेमा पाहिल्यानंतर आयुष्मान खुराणाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने विकी कौशल आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आहे. "नुकतंच छावा सिनेमा पाहिला आणि सिनेमाने सिंहासारखी गर्जना केली आहे", असं आयुष्मान खुराणाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या स्टोरीमध्ये त्याने विकी कौशल, रश्मिका मंदाना, लक्ष्मण उतेकर आणि अक्षय खन्ना यांना टॅगही केलं आहे. 

छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आणि त्यांच्या बलिदानाची गाथा 'छावा' सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. या सिनेमात विकी कौशलने शंभूराजेंची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. लक्ष्मण उतेकरांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात अभिनेता अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. अनेक मराठी कलाकार या सिनेमात झळकले आहेत. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या 'छावा' सिनेमान चारच दिवसांत १४० कोटींचा टप्पा पार केला आहे. 

टॅग्स :'छावा' चित्रपटविकी कौशलआयुषमान खुराणा