Join us

'अल्टी पल्टी'मधील चेतनचा हॉस्पिटलमधील फोटो होतोय व्हायरल, वाचा या मागचे सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 12:03 IST

'अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी' मालिकेतील चेतन हॉस्पिटलमध्ये आहे हे कळल्यावर त्याचे चाहते काळजीत पडले आहेत.

झी मराठी वाहिनी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांसाठी सादर करते. सामान्य लोकांना फसवणाऱ्यांना गंडवण्यात कायम तत्पर असलेल्या दोन ठगांची गोष्ट असलेली 'अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी' हि मालिका झी मराठीवर नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आणि अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देखील दिला.

नुकताच या मालिकेतील नायक चेतन वडनेरे याने त्याचा हॉस्पिटलमधील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि तो आता ठीक असल्याचं त्याच्या चाहत्यांना सांगितलं. पण चेतन हॉस्पिटलमध्ये आहे हे कळल्यावर त्याचे चाहते मात्र काळजीत पडले. पण चिंता करण्याची काहीच बाब नाही. अल्टी पल्टी या मालिकेच्या आगामी भागाचे शूट चालू आहे ज्यात अलंकार आजारी असणार आहे आणि तो प्रसंग हॉस्पिटलमध्ये शूट करण्यात आला. याच चित्रीकरणा दरम्यान चेतनने हा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला. मालिकेत ठगांना शेंडी लावणाऱ्या अलंकारने खऱ्या आयुष्यात देखील चाहत्यांची फिरकी घेतली. अलंकार का आजारी पडलाय? त्याला नेमकं काय झालंय? त्याच्या आजारपणाला पल्लवी जबाबदार आहे का? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल. 

टॅग्स :अल्टी पल्टी, सुमडीत कल्टी