Join us

आता खूपच हँडसम दिसतो तारे जमीन पर फेम दर्शील सफारी, पाहा त्याचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 12:51 IST

दर्शील आता खूपच हँडसम दिसतो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला त्याचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांपासून दर्शील चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण तो चित्रपटांमध्ये काम करत नसला तरी रंगभूमीवर चांगलाच कार्यरत आहे. त्याने कॅन आय हेल्प यू नावाच्या नाटकात देखील काम केले आहे. 

आमिर खानची मुख्य भूमिका असलेला तारे जमीन पर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटात आमिर इतकीच छोट्या ईशानची महत्त्वाची भूमिका होती. या चित्रपटात हा चिमुकला ईशान प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या चित्रपटात ईशानच्या भूमिकेत आपल्याला दर्शील सफारीला पाहायला मिळाले होते. दर्शीलला या चित्रपटामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. 

दर्शील सफारीने तारे जमीन पर या चित्रपटानंतर 'बमबम बोले', 'जोकोमोन', 'मिडनाइट्स चिल्ड्रेन' या चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच तो झलक दिखला जा... या कार्यक्रमात देखील झळकला होता. तारे जमीन पर या चित्रपटाच्या लोकप्रियतेमुळे दर्शीलला अनेक जाहिराती देखील मिळाल्या होत्या. ये हे आशिकी या मालिकेत दर्शील चार वर्षांपूर्वी झळकला होता. पण आता गेल्या काही वर्षांपासून तो चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण तो चित्रपटांमध्ये काम करत नसला तरी रंगभूमीवर चांगलाच कार्यरत आहे. त्याने कॅन आय हेल्प यू नावाच्या नाटकात देखील काम केले आहे. 

दर्शील आता खूपच हँडसम दिसतो. त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला त्याचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात. दर्शीलला आजही प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याचे अनेक फॅन्स त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात. 

दर्शीलला तारे जमीन पर या चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली यामागे देखील एक रंजक किस्सा आहे. शामक दावरच्या डान्स इन्स्टिट्यूटमध्ये दर्शील डान्स शिकायला जात असे. तिथे दिग्दर्शक अमोल गुप्ते यांनी दर्शीलला पाहिले होते आणि तिथूनच दर्शीलचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला होता. 

टॅग्स :दर्शील सफारी