Join us
Daily Top 2Weekly Top 5

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकताच अजय देवगणने शेअर केला काजोलचा 'तो' व्हिडिओ, म्हणाला- "आमच्या घरात..."

By कोमल खांबे | Updated: March 10, 2025 10:40 IST

टीम इंडिया चॅम्पियन्स ठरल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या विजयानंतर संपूर्ण देशभर जल्लोषाचं वातावरण होतं. अनेक सेलिब्रिटीही खेळाडूंना चिअर अप करताना दिसले. टीम इंडिया चॅम्पियन्स ठरल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. 

अजय देवगणने इन्स्टाग्रामवरुन काजोलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ कभी खुशी कभी गम या सिनेमातील आहे. या व्हिडिओत अभिनेत्री भारताचा झेंडा हातात घेऊन "जीत गए" असं म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अजय देवगणने "आमच्या घरात आजही असाच माहौल आहे. अभिनंदन टीम इंडिया", असं म्हटलं आहे. 

भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये दिमाखदार विजय नोंदवत इतिहास रचला आहे. २०१३ नंतर टीम इंडियानं तिसऱ्यांदा या विक्रमी ट्रॉफीवर नाव कोरले. जड्डूनं विजय चौकार मारला अन् तमाम भारतीयांनी एकच जल्लोष केला. हे जेतेपद रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठीही खास ठरले. कारण या जोडीनं आपल्या कारकिर्दीतील ही चौथी आयसीसी ट्रॉफी जिंकलीये. 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५अजय देवगणऑफ द फिल्ड