Join us
Daily Top 2Weekly Top 5

'चला हवा येऊ द्या' अचानक बंद का झालं? साबळेंनीच केला खुलासा म्हणाले, "चॅनल म्हणालं की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 17:33 IST

चला हवा येऊ द्या अचानक बंद का झालं? यावर निलेश साबळेंनीच लोकमत फिल्मीशी बोलताना मौन सोडलंय (chala hawa yeu dya, nilesh sable)

निलेश साबळेंनी लोकमत फिल्मीशी बोलताना चला हवा येऊ द्या अचानक का बंद झाला याचा खुलासा केलाय. निलेश साबळे म्हणतो, "मला असं वाटतं की तो सर्वस्वी झी मराठीचा निर्णय होता. अर्थात झी मराठी चॅनलचे जेव्हढे आभार मानेल तितकं कमीच आहे. कारण तिथून माझी सुरुवात झाली. आणि इतकी वर्ष मी तिथे काम करत होतो. पण प्रत्येक कार्यक्रमाचा शेवट चॅनलने ठरवला असतो. त्यांना असं वाटत होतं की हा कार्यक्रम आता एका गॅपवर जायला पाहिजे."

 निलेश पुढे म्हणाले, "त्यांचं म्हणणं बरोबर होतं. त्यांना असं वाटत होतं की, थोडा गॅप घेऊया..अजून विचारांची चाळण लावुया की अजून काय करता येईल. एक गॅप करूया आपण आणि पुन्हा येऊयात. पण तो गॅप खूप मोठा होता. आमची जानेवारी - नोव्हेंबरच्या आसपास बोलणी झाली होती पहिल्यांदा. तेव्हा सांगण्यात आलं होतं की, २०२४ च्या ऑगस्टमध्ये हा कार्यक्रम होईल. तर कुठेतरी कलाकार म्हणून मला हा गॅप खूप मोठा वाटतं होता. आज सोशल मीडियाच जग आहे. मला एक कलाकार म्हणून वाटतं, तुम्ही १५ दिवस नाहीच दिसलात तर १६ व्या दिवशी लोकं तुम्हाला विसरणार आहेत."

निलेश शेवटी लिहितात, "हा जमाना आहे, ही खरी गोष्ट आहे. तर जर 8 महिने 9 महिने एका ठराविक कार्यक्रमात नाही दिसले.. तर दुसरीकडे भाऊ तुम्हाला वेगळ्या कार्यक्रमात दिसतोय, मी कुठेतरी सूत्रसंचालन करतोय. तर ती टीमही विखुरली जाईल. त्या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांनी जी चौकट आखली होती ती सुद्धा मोडून जाईल. आणि नंतर तुम्ही म्हणाल आता नाही आलात तर चालेल. आता जे लोकं अजूनही भेटत आहेत तर म्हणतात की चला हवा येऊ द्या चालू कधी होणार आहे. Actually ते चालू पण होतं. पण लोकांना माहीत नव्हतं. ते पोहोचत नव्हतं, की ते चालू आहे की बंद आहे. मग मला कळलं की लोकांना ते हवंय. मला असं कधी म्हटले नाहीत की बंद करा आता जरा. मला किंवा भाऊला कोणीही कधी असं म्हणाले नाहीय. लोकांना हवंय तर आपण दिलं पाहिजे. गॅप मोठा होता. म्हणून मी त्या प्रोसेस मधून बाहेर पडलो."

टॅग्स :चला हवा येऊ द्याभाऊ कदम