Join us

Throwback : आईसोबत डान्स एन्जॉय करणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत, आज आहे मोठी स्टार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 08:00 IST

Throwback : सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो पाहण्यात एक वेगळीच मज्जा आहे आणि नेटकरी हे फोटो जाम एन्जॉय करतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

सध्या सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या बालपणींच्या फोटोंना एक नवा  ट्रेंड पाहायला मिळतोय. सेलिब्रिटींचे बालपणीचे फोटो पाहण्यात एक वेगळीच मज्जा आहे आणि नेटकरी हे फोटो जाम एन्जॉय करतात. साहजिकच रोज नव्या सेलिब्रिटीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, फोटो आहे एका चिमुकलीचा. आईसोबत ती मस्तपैकी डान्स करतेय. 

फोटोतील चिमुकली पांढरा फ्रॉक घालून मस्तपैकी पोझ देतेय. या चिमुकलीला तुम्ही ओळखलंत? आज ती टेलिव्हिजनची कॉमेडी क्वीन म्हणून ओळखली जाते. अजूनही तुम्ही तिला ओळखलेलं नसेल तर आम्ही सांगतो. ती दुसरी तिसरी कुणी नसून श्रेया बुगडे (Shreya Bugde) आहे. अलीकडे मदर्स डेच्या निमित्तानं तिने आईसोबतचा हा क्यूट फोटो शेअर केला होता.

श्रेया सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. श्रेया बुगडे तिच्या इन्स्टा अकाऊंटवर नेहमीच स्वत: आणि कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते.  स्वत:चे अनेक ग्लॅमरस फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. याशिवाय अनेक ट्रेंडिंग रिल्सही ती चाहत्यांसोबत शेअर करताना पाहायला मिळते.

 कॉमेडीचं अचूक टायमिंग आणि आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर आज अभिनेत्री श्रेया बुगडे   घराघरात लोकप्रिय झाली आहे. ‘चला हवा येऊ द्या’नं श्रेयाला फक्त ओळखचं मिळवून दिलेली नाही तर तिला प्रसिद्धीच्या शिखरावर देखील पोहचवलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे.  

टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्या