Join us

सिड-कियारानंतर 'चक दे ​​इंडिया'मधील अभिनेत्रीने बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 10:09 IST

Tanya abrol Wedding : सिड व कियाराच्या लग्नानंतर बॉलिवूडची आणखी एक अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचे वारे वाहतायेत. सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी यांनी गेल्या ७ फेब्रुवारीला लग्नगाठ बांधली. त्यानंतर अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय व 'दृश्यम 2'चा दिग्दर्शक अभिषेक पाठक यांनी गोव्यात लग्नगाठ बांधली. चक दे इंडियामधील चित्राशी रावतदेखील बॉयफ्रेंडसोबत लग्न बंधनात अडकली त्यानंतर आणखी एक  'चक दे ​​इंडिया'(Chak De India) गर्लचा विवाह सोहळा संपन्न झाला आहे. चक दे इंडियामधील तान्या अबरोल हीने लग्नगाठ बांधली आहे. तान्या अबरोल 'चक दे ​​इंडिया'मध्ये बलबीर कौरच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसली होती. तिने गुरुवारी तिचा बॉयफ्रेंड आशिष वर्मासोबत लग्न केले. 

अभिनेत्री रुबिना दिलीक आणि अभिनव शुक्ला यांनी वधूसोबत पोज देतानाचे काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यांच्या लग्नाला विद्या माळवदे, शिल्पा शुक्ला, चित्राशी रावत असे लोक उपस्थित होते. सगळे खूप आनंदी दिसत होते. तान्याने लग्नात मरून कलरच्या लेहेंग्यासह हिरव्या रंगाचा ब्लाउज घातला होता. तिनेही गळ्यात हेवी नॅकलेस घातला होता.

 

 तान्या अबरोल हिचे लग्न हिमाचल प्रदेशातील आशिष वर्मासोबत झाले आहे. या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. तान्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी