Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता Carl Weathers चं निधन; वयाच्या 76 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 10:05 IST

Carl weathers: कार्ल वेदर्स यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता कार्ल वेदर्स (Carl Weathers) याचं निधन झालं आहे. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कार्ल वेदर्स हे रॉकी या गाजलेल्या सिनेमातून घराघरात पोहोचले होते. कार्ल वेदर्स यांच्या निधनामुळे हॉलिवूडवर शोककळा पसरली असून प्रत्येक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.

उत्तम अभिनय कौशल्याच्या जोरावर कार्ल वेदर्स यांनी हॉलिवूडमध्ये त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं होतं. आजवर त्यांचे अनेक सिनेमा गाजले. मात्र, 'रॉकी'  या सिनेमातील भूमिका विशेष चर्चेत आली. या सिनेमात त्यांनी एका बॉक्सरची भूमिका साकारली होती. त्यांच्या या भूमिकेचं सर्व स्तरांमधून कौतुक करण्यात आलं होतं.  त्यामुळे त्यांच्या निधनामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. कार्ल यांच्या निधनाचं अद्याप कारण समोर आलेलं नाही.

कार्ल वेदर्स यांचे मॅनेजर मॅट लुबर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. ही बातमी देतांना आम्हाला अत्यंत दु:ख होत आहे. मात्र, कार्ल वेदर्स आता आपल्यात नाहीत. झोपलेल्या अवस्थेमध्येच त्यांचं निधन झालं आहे, अशी माहिती मॅट लुबर यांनी दिली.दरम्यान, कार्ल यांनी रॉकी या सिनेमा व्यतिरिक्त द मांडलोरियन, प्रीडेटर, अॅक्शन जॅक्शन, हॅप्पी गिलमोर या सिनेमांमध्ये काम केलं.

टॅग्स :हॉलिवूडसेलिब्रिटी