Join us
Daily Top 2Weekly Top 5

"६० व्या वर्षी अभिनेते रोमॅन्टिक भूमिका करू शकतात, पण महिलांना...", 'बॉर्डर-२' फेम अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:05 IST

"इंडस्ट्रीत महिलांची एक्सपायरी डेट ठरलेली असते...", 'बॉर्डर-२' फेम अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील विचारधारेबद्दल व्यक्त केली नाराजी

Mona Singh: २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित झालेला बॉर्डर २ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहे. अनुराग सिंह दिग्दर्शित या सिनेमा प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अभिनेता सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी, मेधा राणा, मोना सिंह,सोनम बाजवाच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचत आहे. अभिनेत्री मोना सिंहने चित्रपटात  सनी देओलच्या ऑनस्क्रिन पत्नीची भूमिका साकारली आहे. तिने केलेल्या कामचं सगळीकडेच कौतुक होताना दिसतंय.मोनाने आजवर अनेक मालिका, रिअॅलिटी शोजचे सूत्रसंचालन करून यशस्वी वाटचाल केली आहे.  याच निमित्ताने एका मुलाखत केलेल्या वक्तव्यामुळे मोना चर्चेत आली आहे.  मोना सिंहने तिच्या करिअरमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. '३ इडियट्स' मधील मोना सहस्रबुद्धे, 'लाल सिंग चड्ढा' मधील गुरप्रीत कौर चड्ढा आणि 'बॉर्डर २' मधील सिमी कालेर यांचा समावेश आहे. यापैकी काही चित्रपटांमध्ये तिने तिच्या वयापेक्षाही मोठे रोल केले आहेत.

अलिकडेच  पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये मोनाने चित्रपटसृष्टीतील वास्तवावर भाष्य केलं आहे.शिवाय चित्रपटांमध्ये जास्त वयाच्या भूमिका साकारण्याबद्दल सांगितलं आहे. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली, "मी कधीच माझ्या पडद्यावर दिसणाऱ्या वयाची पर्वा केली नाही.कारण मला आत्मविश्वास आहे. मला माहित आहे की मी कोण आहे.मला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. लोक मला अनेकदा विचारतात की तू चित्रपटांमध्ये वयापेक्षा मोठे रोल का करतेस. पण, त्यांना मी एकच सांगते की या सगळ्या गोष्टींमुळे मला काहीच फरक पडत नाही. मी फक्त हेच पात्र साकारत आहे.या भूमिकेने मला खूप उत्साहित केलं, म्हणून मी ते साकारण्याचा निर्णय घेतला." 

या मुलाखतीत मोना सिंहने इंडस्ट्रीतीवल विचारधारेबद्दर नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, इंडस्ट्रीत महिलांच्या करिअरला एक्सपायरी डेट असते. हे  वाईट आहे. ६० वर्षांचा नायक अजूनही चित्रपटांमध्ये रोमँटिक भूमिका साकारू शकतो, परंतु महिला ते करू शकत नाहीत. पण मी त्याबद्दल कधी विचारच केला नाही, कारण मला असं व्हायचं नव्हतं." असं मत अभिनेत्रीने व्यक्त केलं आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mona Singh: Male actors romance at 60, not women?

Web Summary : Mona Singh, starring in 'Border 2,' criticizes the film industry's gender bias. She highlights the disparity where older male actors still get romantic leads, while women face an 'expiry date' in their careers, a reality she rejects.
टॅग्स :सीमारेषामोना सिंगसनी देओलवरूण धवन