Join us
Daily Top 2Weekly Top 5

श्रीदेवीची अंतिम इच्छा पूर्ण करणार बोनी कपूर, जाणून घ्या काय आहे ही इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 21:00 IST

बॉलिवूडचे निर्माते बोनी कपूर त्यांची पत्नी व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची अंतिम इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे

ठळक मुद्देश्रीदेवीला करायची होती तमीळ चित्रपटाची निर्मितीतमीळ चित्रपट अभिनेता अजीतला घेऊन करायचा होता श्रीदेवीलाइंग्लिश विंग्लिश चित्रपटात अजीत व श्रीदेवीने केले होते काम

बॉलिवूडचे निर्माते बोनी कपूर त्यांची पत्नी व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची अंतिम इच्छा लवकरच पूर्ण करणार आहे. याबाबतचा खुलासा नुकताच बोनी कपूर यांनी केला आहे. श्रीदेवीला जीवनात एकदा तरी तमीळ चित्रपटाची निर्मिती करायची होती आणि त्या चित्रपटात अजीत काम करेल. 

अभिनेता अजीतने श्रीदेवीसोबत इंग्लिश विंग्लिश चित्रपटात काम केले होते. श्रीदेवीची इच्छा पूर्ण करण्यासाठी बोनी कपूरने पिंक चित्रपटाचा तमीळ रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोनी कपूर यांनी सांगितले की, अद्याप चित्रपटाचे शीर्षक ठरवलेले नाही. अजीत सोबत इंग्लिश विंग्लिश चित्रपटात काम केल्यानंतर श्रीदेवीने इच्छा व्यक्त केली होती की अजीत सोबत आपण आपल्या होम प्रोडक्शनखाली तमीळ सिनेमाची निर्मिती करूयात. बऱ्याच कालावधीपासून आम्हाला चांगली स्क्रीप्ट मिळाली नव्हती. त्यानंतर अजीतने तमीळमध्ये पिंक चित्रपट बनवण्याचा प्रस्ताव दिला.तसेच कपूर घराण्यातील तरुण पिढीला पुढे आणण्यासाठी प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बोनी कपूर पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटात अर्जुन कपूर, जान्हवी कपूर या बहीण भावासोबत त्यांच्या काकांच्या मुलांच्याही भूमिका असणार आहेत. बोनी कपूर यांना सुरूवातीपासून दिग्दर्शक व्हायचे होते. शक्ती सामंता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत सहायक म्हणून काम केले. मात्र वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना निर्मात्याची धुरा सांभाळावी लागलीय. आता बोनी कपूर यांना दिग्दर्शन करण्याची इच्छा पूर्ण करायची आहे. त्यामुळे त्यांनी जान्हवी व अर्जुनला घेऊन चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :बोनी कपूरश्रीदेवी