Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोनी कपूर अशाप्रकारे श्रीदेवी यांच्या आठवणींना करणार जतन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 12:16 IST

दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्याने झालेल्या दु:खातून कपूर फॅमिली बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या जाण्याने झालेल्या दु:खातून कपूर फॅमिली बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. पती बोनी कपूर यांना तर फारच मोठा धक्का बसला आहे. आता ते श्रीदेवी यांच्या आठवणींना जतन करुन ठेवणार आहेत.  

मीडिया रिपोर्टनुसार, बोनी कपूर हे लवकरच श्रीदेवी यांच्यावर जीवनावर एक डॉक्यूमेंट्री करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या बोनी कपूर हे या डॉक्यूमेंट्रीच्या तयारीला पूर्ण वेळ देत आहेत. या डॉक्यूमेंट्रीसाठी बोनी कपूर यांनी श्री', 'श्रीदेवी' आणि 'श्रीदेवी मॅम' हे तीन टायटल रजिस्टर सुद्धा केले आहेत.

श्रीदेवी यांनी काम केलेल्या सिनेमांचे टायटलही बोनी कपूर यांनी रजिस्टर केले आहेत. त्यांनी एकूण 20 टायटल्स रजिस्टर केले आहेत. बोनी कपूर हे या डॉक्यूमेंट्रीमध्ये सगळेच रिअल फुटेज वापरणार आहेत. त्यामुळे श्रीदेवी यांचं जगणं आणखीन वेगळ्याप्रकारे सर्वांसमोर येणार आहे.

टॅग्स :श्रीदेवीबॉलिवूड