Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोनी कपूर अन् लेकींनी विकले मुंबईतील 4 फ्लॅट्स, नेटकरी म्हणाले, 'फारच स्वस्तात केली डील'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 17:22 IST

कपूर बापलेकीने एकाच वेळी विकले चार फ्लॅट्स!

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor), बहीण खुशी कपूर (Khushi Kapoor) आणि त्यांचे वडील निर्माते बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी वर्षाच्या शेवटी मोठी डील केली आहे. त्यांनी मुंबईतील ४ फ्लॅट्सची विक्री केली आहे. अंधेरी येथील ग्रीन एकर्स सोसायटीतील ४ अपार्टमेंट त्यांनी विकले आहेत. या चारही अपार्टमेंटची डील कोट्यवधी रुपयांना झाली आहे. 

चार अपार्टमेंटपैकी एक सिद्धार्थ नारायण आणि अंजू नारायण यांनी घेतला आहे. हा फ्लॅट 1870 स्क्वेअर फीटचा आहे. तर मुस्कान बहिरवानी आणि ललित बहिरवानी यांनी 1614 स्क्वेअर फीटचे दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. काही दिवसांपूर्वीच जान्हवी आणि खुशीने बांद्रा येथे 65 कोटींना घर खरेदी केलं. हे घर 8669 स्क्वेअर फीटचं आहे. यामध्ये एक मोठं गार्डन, स्वीमिंग पूल आणि पार्किंगचाही समावेश आहे. ईटाइम्सला दिलेल्या माहितीनुसार बोनी कपूर यांनी फ्लॅट विक्री केल्याचं कन्फर्म केलं आहे. आश्चर्य म्हणजे हे फ्लॅट्स दोन्ही खरेदीकर्त्यांना केवळ 6-6 कोटींना देण्यात आले आहेत. म्हणजेच कपूर बापलेकीने १२ कोटींना 4 फ्लॅट्स विकले आहेत. 

आता कपूर कुटुंबाने इतके फ्लॅट का विकले, नक्की काय अशी गरज पडली असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. काही महिन्यांपूर्वीच रणवीर सिंहनेही 15.24 कोटींना दोन फ्लॅट विकले होते. जान्हवी लवकरच 'देवरा' सिनेमात दिसणार आहे. यावर्षी तिचा 'बवाल' हा सिनेमा रिलीज झाला. यातील तिच्या भूमिकेचं कौतुकही झालं. तर खुशी कपूरनेही यंदा 'द आर्चीज' सिनेमातून पदार्पण केलं आहे.

टॅग्स :बोनी कपूरजान्हवी कपूरखुशी कपूरमुंबई