Join us
Daily Top 2Weekly Top 5

​टायगर-दिशाला जॅकीचा पाठींबा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2016 14:25 IST

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांच्या बे्रकअपच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना निराश केले होते. टायगरची आई आयशा श्रॉफ या दोघांच्या ...

टायगर श्रॉफ आणि दिशा पाटणी यांच्या बे्रकअपच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना निराश केले होते. टायगरची आई आयशा श्रॉफ या दोघांच्या प्रेमाच्या आड आली, अशी खबर होती. पण खुद्द टायगरचे पिता अर्थात जॅकी श्रॉफ यांनी या मुद्यावर चुप्पी तोडत, या निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे. लोक काय म्हणतील, यामुळे मला फारसा फरक पडत नाही. दिशा व टायगर चांगले मित्र आहेत आणि आम्ही यामुळे आनंदात आहोत. कृपया, त्यांना शांततेत राहू द्यावे, असे जॅकी यांनी म्हटले आहे. एकंदर काय, तर टायगर व दिशा अजूनही एकमेकांसोबत आहेत, याचेच संकेत जॅकी यांनी दिले आहेत. टायगर व दिशा अनेकदा डिनर डेट एन्जॉय करताना दिसले. एकत्र सुटी एन्जॉय करताना दिसले. दोघांनीही त्यांचे रिलेशन जाहिर केले नसले तरी त्यांचे नाते लपूनही राहिलेले नाही. आता हे नाते येणा-या दिवसांत किती बहरते, ते बघूच!