Join us  

‘झिरो’चे नवे गाणे ‘हुस्र परचम’! पाहा, कॅटरिना कैफच्या हॉट अदा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 3:10 PM

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या ‘झिरो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे नवे गाणे आज रिलीज झाले. ‘हुस्र परचम’ असे या गाण्याचे बोल आहेत.

ठळक मुद्दे. कॅटरिना कैफवर चित्रीत हे गाणे सध्या सोशल मीडियावर धूम करतेय. या लेटेस्ट गाण्यातील कॅटरिनाच्या सेक्सी डान्स मुव्ह वेड लावणा-या आहेत.

बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याच्या ‘झिरो’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचे नवे गाणे आज रिलीज झाले. ‘हुस्र परचम’ असे या गाण्याचे बोल आहेत. कॅटरिना कैफवर चित्रीत हे गाणे सध्या सोशल मीडियावर धूम करतेय. या लेटेस्ट गाण्यातील कॅटरिनाच्या सेक्सी डान्स मुव्ह वेड लावणा-या आहेत. रिलीज झालेल्या गाण्यात शाहरुखला लग्नाची हळद लागतेय आणि दुसरीकडे बबीता कुमारी आपला जलवा दाखवतेय.

‘झिरो’ची आत्तापर्यंत तीन गाणी रिलीज झाली आहेत. पहिले गाणे ‘मेरा नाम तू’ अनुष्का शर्मा व शाहरुख खानवर चित्रीत करण्यात आले होते. तर ‘इश्कबाजी’ या दुस-या गाण्यात शाहरुख व सलमान खान यांची जुगलबंदी दिसली होती. या दोन्ही गाण्यांना चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तिसरे गाणे ‘हुस्र परचम’ही सोशल मीडियावर हिट झाले आहे. तुम्हीही पाहा आणि कसे वाटले ते जरूर कळवा.‘झिरो’ या चित्रपटात कॅटरिना कैफ बबीता कुमारीची भूमिका साकारताना दिसणार आहे. शाहरुख खान बऊआ सिंग या बुटक्या व्यक्तिचे पात्र साकारणार आहे. अनुष्का शर्माही या महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘झिरो’ या चित्रपटात शाहरुख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे. शून्यापासून सुरू केलेला त्याचा प्रवास यात दिसणार आहे. शाहरूखसोबत कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यादेखील यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अनुष्का, कॅटरिना व शाहरूख यांच्या प्रेमाचा त्रिकोण यात पाहायला मिळणार आहे. एकं हा चित्रपट नाताळाच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :झिरो सिनेमाकतरिना कैफशाहरुख खान