Join us
Daily Top 2Weekly Top 5

'झिरो'मधील ह्या गाण्यात दिसले पुन्हा एकदा करण-अर्जुन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2018 14:29 IST

'झिरो' चित्रपटातील दुसरे गाणे 'इश्कबाजी' प्रदर्शित झाले आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचा आगामी बहुचर्चित चित्रपट 'झिरो'मधील 'मेरे नाम तू' नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या गाण्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यानंतर आता या चित्रपटातील दुसरे गाणे 'इश्कबाजी' प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील बोल खूप चांगले असून बीट्सदेखील शानदार आहेत. या वर्षातील हे गाणे डान्स नंबर असल्याचे चाहत्यांकडून सांगितले जात आहे. या गाण्यात शाहरूख खानसोबत सलमान खानदेखील दिसतो आहे. 

'झिरो' चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे आणि नुकतेच शाहरूख खानने चित्रपटाचे शेवटचे डबिंग शेड्युल पूर्ण केले आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत अनुष्का शर्मा व कतरिना कैफ दिसणार आहे. तसेही झिरो चित्रपटात बॉलिवूडमधील काही सेलेब्स केमिओ करताना दिसणार आहेत. या सेलेब्समध्ये श्रीदेवी देखील आहे. 

'झिरो'मधील पहिले गाणे 'मेरे नाम तू' प्रदर्शित झाल्यानंतर वीस तासात १४ मिलियन व्ह्यूज मिळाले होते. गाणे सुरू होण्याआधीशाहरूख व अनुष्कामध्ये बातचीत होते. त्यानंतर सुरू होतो किंग खानचा रोमांस. 'झिरो' चित्रपटात शाहरूख खान एका बुटक्या व्यक्तिच्या भूमिकेत आहे.  यापूवीर्ही अनेक चित्रपटात याच तंत्राचा वापर करून लहानाला मोठे आणि मोठ्याला लहान दाखवण्यात आले आहे. यात अनुष्का एका महिला शास्त्रज्ञाच्या तर कॅटरिना एका व्यसनी अभिनेत्रीची भूमिका वठवणार आहेत. केवळ इतकेच नाही तर काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे.

टॅग्स :झिरो सिनेमाशाहरुख खानसलमान खान