Join us

जीशान बनला सलमानचा मित्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2016 17:17 IST

होय, मोहम्मद जीशान अयूब सध्या सलमान खानचा जीवलग मित्र बनला आहे. अर्थात आॅनस्क्रीन. ‘ट्युबलाईट’ या चित्रपटात जीशान सलमानच्या मित्राची ...

होय, मोहम्मद जीशान अयूब सध्या सलमान खानचा जीवलग मित्र बनला आहे. अर्थात आॅनस्क्रीन. ‘ट्युबलाईट’ या चित्रपटात जीशान सलमानच्या मित्राची भूमिका साकारत आहे. जीशान या चित्रपटात सैनिकाच्या भूमिकेत आहे. जीशान हा शाहरूखसोबत ‘रईस’मध्येही काम करतो आहे. शाहरूख जीशानचा अभिनय पाहून कमालीचा प्रभावित आहे. शूटींगदरम्यान जीशानचा एक सीन शाहरूखला इतका प्रभावित करून गेला की, त्याने चक्क जीशानला अलिंगनच दिले. आनंद एल राय यांच्या ‘तनु वेड्स मनु’मधून जीशान चर्चेत आला होता. पण तत्पूर्वी ‘रांझणा’मधील त्याच्या अभिनयाचे सर्वांनीच कौतुक केले होते. ‘ट्युबलाईट’चे दिग्दर्शक कबीर खान यांच्यासोबत ‘फँटम’मध्येही त्याने काम केले आहे.