बॉलिवूडमधून गायब झालेल्या जायेद खानला टीव्हीचा आधार!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 12:43 IST
बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याची एक्स वाईफ सुजैन खान हिचा भाऊ जायेद खान आठवतो? जायेद खान दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब ...
बॉलिवूडमधून गायब झालेल्या जायेद खानला टीव्हीचा आधार!!
बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याची एक्स वाईफ सुजैन खान हिचा भाऊ जायेद खान आठवतो? जायेद खान दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. ‘मैं हू ना’ आणि ‘शब्द’ सारख्या चित्रपटात जायेद खान दिसला आणि नंतर अचानक दिसेनासा झाला. चित्रपटात यश मिळेनासे झाल्यावर जायेदने बी-टाऊनमधून एक्झिट घेतली. पण म्हणतात ना, अभिनयाचा किडा स्वस्थ बसू देत आहे. जायेदबद्दलही असेच काही म्हणता येईल. होय, कारण मोठ्या पडद्यावर यश मिळत नाही, म्हटल्यावर छोट्या पडद्याकडे वळण्याचा निर्णय जायेदने घेतला आहे. जायेद लवकरच एका नव्या शोमध्ये दिसणार आहे. जायेदने स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रोड्यूसर- डायरेक्टर सिद्धार्थ पी मल्होत्राच्या अपकमिंग शोमध्ये जायेद एका बिझनेसमॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. जायेदशिवाय या शोमध्ये ‘एक हसीना थी’ फेम वत्सल सेठ याची आणि ‘ड्रिम गर्ल’ फेम निकिता दत्ता यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सन 2003 मध्ये ‘चुरा लिया है तुमने’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. यात तो ईशा देओलसोबत दिसला होता. यानंतर २००४ मध्ये तो शाहरूख खानसोबत ‘मैं हू ना’मध्ये झळकला. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. यानंतर अर्जुन रामपाल आणि अमीषा पटेल यांच्यासोबत तो ‘वादा’मध्ये दिसला. यापश्चात ‘शब्द’,‘दस’मध्येही त्याने काम केले. या चित्रपटातील त्याच्या कामाची बरीच प्रशंसा झाली. पण तरिही सपोर्टिंग हिरो इतकीच ओळख जायेदला मिळाली. यापलीकडे कुठलीही ओळख त्याला मिळाली नाही. ‘दस’नंतर ‘शादी नंबर1’मध्ये जायेद दिसला. पण हा चित्रपट दणकून आपटला. तसे जायेदच्या फिल्मी करिअरलाही ब्रेक लागला. २००५ मध्ये जायेदने लग्न केले. त्याला दोन मुले आहेत.