बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कुठल्या चित्रपटामुळे नव्हे तर एका वादामुळे. होय, जरीने तिची पूर्वाश्रमीची मॅनेजर अंजली अथविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अंजलीने आपल्याला अश्लिल मॅसेज केलेत व जीवे मारण्याची धमकी दिली,खोट्या बातम्या पेरून आपली प्रतिमा मलीन केली, तसेच करार संपल्यानंतरही आपल्या नावावर सिनेसृष्टीतील लोकांकडून पैसे उकळले, असे आरोप जरीनने आपल्या तक्रारीत केले आहेत.जरीनच्या तक्रारीनंतर मुंबईच्या खार पोलिस ठाण्यात अंजलीविरोधात भादंवीच्या कलम ५०९ अन्वये (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार व कृती करणे) गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, अंजली अथने जरीनसोबत तीन ते चार महिने काम केले होते. यादरम्यान पैशाच्या व्यवहारावरून दोघींमध्ये वाद झाला होता. या प्रकरणासंदर्भात दोघींही मॅसेजद्वारे एकमेकींशी बोलल्या आणि याचदरम्यान अंजलीने जरीनला आक्षेपार्ह मॅसेज पाठवले. अंजली अथा हे बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत मॅनेजर म्हणून काम केले आहे.
जरीन खानची पोलिसात धाव, एक्स मॅनेजरने दिली जीवे मारण्याची धमकी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 12:07 IST
बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कुठल्या चित्रपटामुळे नव्हे तर एका वादामुळे. होय, जरीने तिची पूर्वाश्रमीची मॅनेजर अंजली अथविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जरीन खानची पोलिसात धाव, एक्स मॅनेजरने दिली जीवे मारण्याची धमकी!!
ठळक मुद्देअंजलीने आपल्याला अश्लिल मॅसेज केलेत व जीवे मारण्याची धमकी दिली,खोट्या बातम्या पेरून आपली प्रतिमा मलीन केली, तसेच करार संपल्यानंतरही आपल्या नावावर सिनेसृष्टीतील लोकांकडून पैसे उकळले, असे आरोप जरीनने आपल्या तक्रारीत केले आहेत.