Join us
Daily Top 2Weekly Top 5

देसी लूकमध्ये जान्हवी कपूर झाली ‘सैराट’, पहा तिच्या अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 21:59 IST

प्रत्येकवेळी स्टारडॉटर जान्हवी कपूरला देसी लूकमध्ये बघणे तिच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटप्रमाणे असते. यावेळेसदेखील चाहत्यांना तिचा हा अंदाज बघावयास मिळाला ...

प्रत्येकवेळी स्टारडॉटर जान्हवी कपूरला देसी लूकमध्ये बघणे तिच्या चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटप्रमाणे असते. यावेळेसदेखील चाहत्यांना तिचा हा अंदाज बघावयास मिळाला आहे. देसी लूकमध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. मुंबईच्या गर्मीला मात देण्यासाठी जान्हवीने एक कुर्ता आणि पांढºया रंगाचा पलाजो परिधान केला होता. या साधारण कुर्त्यामध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत होती. माध्यमांचे कॅमेरे बघून ती लाजत होती. आता जान्हवीलादेखील माध्यमांची सवय होत असून, स्टार बनणे सोपे नाही हे ती जाणून आहे. खरं तर जान्हवी जेव्हा जेव्हा स्पॉट झाली तेव्हा तेव्हा तिच्या लूकवर चाहते फिदा झाले. त्यामुळे चाहत्यांच्या मनात घर करण्यात जान्हवी यशस्वी झाली, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. दरम्यान, या फोटोमध्ये जान्हवीचा अंदाज मम्मी श्रीदेवीसारखा दिसत आहे. तिच्या चेहºयावरील हास्य बघून हे स्पष्ट होते की, ती कुठल्यातरी विषयामुळे खूपच आनंदी आहे. जान्हवीचे हे फोटो बघून तुमच्याही ही बाब लक्षात येईल. काही दिवसांपूर्वीच सारा अली खान ट्रेडिशनल लूकमध्ये बघावयास मिळाली होती. तिच्या ‘केदारनाथ’ या डेब्यू चित्रपटात तिला सिम्पल लूकमध्ये दाखविण्यात येणार असल्याने तिने ट्रेडिशनल लूकची सवय लावण्यास सुरुवात केली होती. आता तिच्या पावलावर पाऊल ठेवताना जान्हवी कपूर दिसली. जान्हवीच्या बॉलिवूड डेब्यूविषयी सांगायचे झाल्यास, लवकरच ती तिच्या डेब्यू चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. वृत्तानुसार, येत्या नोव्हेंबर महिन्यापासून ‘सैराट’च्या हिंदी रिमेकच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूरचा लहान भाऊ ईशान खट्टर बघावयास मिळणार आहे. हा चित्रपट मराठी ‘सैराट’चा रिमेक असणार आहे. दरम्यान, आपल्या लेकीच्या डेब्यूसाठी पप्पा बोनी कपूर खूपच कॉन्फिडेंट आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी म्हटले होते की, माझी मुलगी या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. सध्या ती तिच्या कामावर फोकस ठेवून आहे. चित्रपटात एंट्री करण्याअगोदर तिने क्लासिकल डान्सची ट्रेनिंग घेण्यास सुरुवात केली आहे.