Join us

‘अशा’ अवस्थेत कोणी फोटो काढू नये म्हणून जरीन खान घराबाहेर पडणे टाळायची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 15:03 IST

२०१० मध्ये ‘वीर’ या चित्रपटातून सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री जरीन खान लवकरच प्रेक्षकांना हॉट अंदाजात ...

२०१० मध्ये ‘वीर’ या चित्रपटातून सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री जरीन खान लवकरच प्रेक्षकांना हॉट अंदाजात बघावयास मिळणार आहे. ‘हेट स्टोरी-३’मध्ये जरबदस्त बोल्ड सीन्स देणारी जरीन आता २००६ मध्ये आलेल्या इमरान हाशमी आणि उदिता गोस्वामी स्टारर ‘अक्सर’ या चित्रपटाच्या सीक्वल ‘अक्सर-२’मध्ये झळकणार आहे. बी-टाउनमधील हॉट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून जरीनला ओळखले जाते. मात्र अशातही ‘वीर’नंतर तिला इंडस्ट्रीत म्हणाव्या तशा आॅफर मिळाल्या नाहीत. याचे एकमेव कारण म्हणजे जरीनचे वाढलेले वजन होते. जरीनवर याचा ऐवढा परिणाम झाला होता की, घराबाहेर पडताना ती अक्षरश: घाबरायची. जरीन खाननेच एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. तिने म्हटले की, सलमानसोबत ‘वीर’मध्ये काम केल्यानंतरही मला बॉलिवूडमध्ये संघर्ष करावा लागला. याचे एकमेव कारण म्हणजे माझे वाढलेले वजन होते. वाढलेल्या वजनाचे कारण देऊन कोणीही मला चित्रपटात संधी देण्यास तयार नव्हते. सलमान खानसोबत मला ड्रीम डेब्यू करण्याची संधी नक्की मिळाली, मात्र त्यानंतर मला संघर्ष करावा लागला हेही तेवढेच खरे आहे. मला असे म्हटले जायचे की, तू इंडस्ट्रीत एका यशस्वी अभिनेत्रीप्रमाणे (कॅटरिना कैफ) दिसतेस. परंतु तिच्या तुलनेत तुझे वजन खूपच आहे. जरीनच्या मते, एक काळ असा होता की, माझे वजन एखाद्या राष्टÑीय मुद्द्याप्रमाणे चर्चिले जात होते. विशेष म्हणजे इतर अभिनेत्रींना त्यांच्या वजनावरून कधीच कामापासून दूर ठेवले जात नव्हते; परंतु माझ्याबाबतीत सगळे उलटे घडत होते. मी कशी दिसते?, मी कसे कपडे परिधान करते? यावरून माझ्यावर चहुबाजूने टीका केली जात होती. त्यामुळे मला घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते. माझ्या इच्छा नसतानाही मला केवळ वाढलेल्या वजनामुळे ‘ए’ ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावे लागले. पुढे बोलताना जरीनने म्हटले की, त्यावेळी तर मला असे वाटत होते की, अशा अवस्थेत कोणी माझा फोटो काढू नये. जेणेकरून लोकांना टीका करायला आणखी वाव मिळेल. अशातही मला डिप्रेस होऊन चालणार नव्हते. कारण मला माझे करिअर पुन्हा ट्रॅकवर आणायचे होते. असो सध्या जरीन खानने तिच्या बॉडीला पहिल्यापेक्षा खूप फिट बनविले आहे. सध्या तिचे फिटनेसवरून सर्वत्र कौतुकही केले जात आहे.