Join us

राजकारण शिकण्यासाठी सज्ज आहे जाकीर खान, 'चाचा विधायक है हमारे २'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 18:42 IST

लोकप्रिय कॉमेडी सीरिज 'चाचा विधायक है हमारे'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवरील लोकप्रिय कॉमेडी सीरिज 'चाचा विधायक है हमारे'चा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या शोची निर्मिती जाकीर खानने केले असून यात त्याने रॉनी भैयाची भूमिका केली आहे.

 'चाचा विधायक है हमारे' या शोमध्ये दाखवण्यात आले आहे की, रॉनी भैया कशाप्रकारे राजकारणमध्ये आपला मार्ग बनवण्याचा प्रयत्न करतो. खरेतर याची सुरूवात तेव्हा होते जेव्हा इंदौरमध्ये राहणारा रॉनी त्याचे काका आमदार होण्याबाबत खोटे बोलतात आणि असे करून त्यांच्या जीवनात आलेल्या समस्या दूर करायच्या आहेत. प्रेक्षकांना  'चाचा विधायक है हमारे' या शोचा पहिला सीझन खूप आवडला होता. ज्याच्या शेवटी रॉनीचा सामना खऱ्या आमदारासोबत होतो आणि त्यांचे खोटे समोर येते. सीझन२ ची कथा पुढे सरकते ज्यात रॉनी आमदारासोबत काम करायला सुरूवात करतो आणि राजकारणाच्या जगात पाऊल ठेवतो. 

 'चाचा विधायक है हमारे २' या शोच्या दुसरा सीझनदेखील दमदार आणि खूप हसविणारा आहे. यात रॉनी राजकारणात पाऊल टाकण्यासोबत दोन लोकांमधील आमने सामने आणि लव्ह ट्रॅंगल इंटरेस्टिंग अंदाजात दाखवण्यात आले आहे. 

ओएमएल निर्मित आणि शशांत शाह दिग्दर्शित  'चाचा विधायक है हमारे २' या शोमध्ये जाकिर खानसोबत जाकीर हुसैन, सन्नी हिंदुजा, कुमार वरूण, व्योम शर्मा, अलका अमीन, वीनस सिंग आणि ओनिमा कश्यम मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा शो २६ मार्चपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पहायला मिळणार आहे.

टॅग्स :वेबसीरिज