Join us
Daily Top 2Weekly Top 5

​या गोष्टीमुळेच जहीर खानच्या घरातल्यांनी दिला जहीर आणि सागरिका घाडगेच्या लग्नाला होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 17:24 IST

क्रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाडगे २७ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे सगळ्यांनाच माहिती आहे. सागरिका ही हिंदू असून ...

क्रिकेटर जहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाडगे २७ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार असल्याचे सगळ्यांनाच माहिती आहे. सागरिका ही हिंदू असून जहीर हा मुसलमान आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माच्या पद्धतीने लग्न करण्यापेक्षा ते दोघे कोर्ट मॅरेज करणार आहेत. जहीर आणि सागरिका गेल्या कित्येक महिन्यांपासून नात्यात आहेत. त्यांनीच ही गोष्ट मीडियाला सांगितली होती. त्या दोघांनी धुमधडाक्यात साखरपुडा देखील केला होता. त्यांच्या या साखरपुड्याला बॉलिवूड आणि क्रिकेट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. लग्नाला देखील अनेक दिग्गज उपस्थिती लावणार असल्याचे म्हटले जात आहे.जहीर आणि सागरिका यांनी नुकतीच एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत जहीरने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. जहीर खान आणि सागरिका हे दोघे वेगवेगळ्या धर्माचे असल्याने त्यांच्या लग्नात काही अडथळा आला होता का असे जहीरला विचारले असता त्याने त्यावेळेचा एक खूप गमतीदार किस्सा सांगितला. जहीर सांगतो, मी आणि सागरिकाने ज्यावेळी लग्न करण्याच निर्णय घेतला, त्यावेळी ही गोष्ट माझ्या घरात सांगितली. त्यावर सागरिकाचा चक दे इंडिया हा चित्रपट आम्हाला पहिल्यांदा पाहायचा आहे आणि त्यानंतरच आम्ही तुमच्या लग्नाच्या बाबतीत निर्णय घेऊ असे माझ्या घरातल्यांनी मला सांगितले. त्यावर मी लगेचच चक दे इंडिया या चित्रपटाची सीडी आणून दिली आणि हा चित्रपट सगळ्यांना दाखवला. हा चित्रपट पाहिल्यानंतरच माझ्या घरातल्यांनी सागरिका आणि माझ्या लग्नाला परवानगी दिली. जहीर आणि सागरिका हे कोर्ट मॅरेज करणार असले तरी मेहेंदी, हळद, संगीत यांसारखे सगळे कार्यक्रम त्यांच्या लग्नाच्या आधी त्यांच्या घरातल्यांनी आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांना जहीर आणि सागरिका यांचे जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित राहाणार आहेत. जहीर हा पुण्याचा असल्याने यातील काही कार्यक्रम हे पुण्यात होणार आहेत तर सागरिका ही कोल्हापूरची आहे. सागरिकाच्या कोल्हापूरच्या घरी देखील काही रितीरिवाज केले जाणार आहेत. पण हे रितीरिवाज लग्नाच्या काही दिवसांनंतर केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. Also Read : ​तुम्हाला माहीत आहे का झहीर खानची होणारी पत्नी सागरिका घाटगे या अभिनेत्याची मुलगी आहे