Join us
Daily Top 2Weekly Top 5

सागरिकाला भावतो झहीरचा ‘क्लिन लूक’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 15:11 IST

मी शेव करू की नको? या विराट कोहलीने विचारलेल्या प्रश्नावर अनुष्का शर्माचे काय उत्तर होते, हे तुम्हाला ठाऊक आहेच. ...

मी शेव करू की नको? या विराट कोहलीने विचारलेल्या प्रश्नावर अनुष्का शर्माचे काय उत्तर होते, हे तुम्हाला ठाऊक आहेच. तिने नाही, असे उत्तर दिले होते. विराट  क्लिन शेवमध्ये असलेला अनुष्काला अजिबात आवडत नाही. कारण तिला विराटचा बिअर्ड लूकच जास्त भावतो. याऊलट गोलंदाज झहीर खान याच्या प्रेयसीला (प्रेयसी नाही आता मंगेतर म्हणायला हव२)विचाराल तर तिला  झहीरचा ‘चिकना’ लूक अधिक भावतो.  झहीरची मंगेतर कोण तर अभिनेत्री सागरिका घाटगे.  झहीर व सागरिकाचा अलीकडेच साखरपुडा झाला आहे.सागरिकाने सोशल मीडियावर नुकताच  झहीरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ‘या अनोळखी व्यक्तीसोबत मी घरी परतलेय’ , असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. या कॅप्शमध्ये तिने  झहीरला टॅग केले असून, त्यास  ब्रेक द बिअर्ड  (#breakthebeard) हा हॅशटॅगही दिला आहे.  झहीरचा क्लिन शेव्ह केलेला लूक यात पाहावयास मिळतो. त्याच्या या नव्या लूकवर सागरिका भलतीच लट्टू झालेली दिसतेय. झहीर आणि सागरिका यांनी सोशल मीडियावर आपल्या एंगेजमेंटची बातमी शेअर केली होती. ‘कधीच आपल्या जोडीदाराच्या आवडींवर हसू नये. तुम्हीसुद्धा त्यापैकीच एक असता’, अशी एक पोस्ट टाकत  झहीरने सागरिका त्याची आता आयुष्यभराची जोडीदार असल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. त्याचवेळी सागरिकानेही साखरपुड्याची अंगठी दाखवत ही आनंदाची बातमी सर्व चाहत्यांशी शेअर केली होती. एकंदर काय, तर सागरिकाला आपल्या होणा-या हबीचा क्लिन लूक आवडतो तर अनुष्काला तिच्या प्रियकराचा बिअर्ड लूक आवडतो. शेवटी काय, तर चॉईस अपनी अपनी, आणखी काय!!