Join us

झहीर-सागरिका येत्या २७ नोव्हेंबरला करणार लग्न; लग्नाची पत्रिका झाली व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2017 12:31 IST

क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील जोडी म्हणजेच भारताचा स्टार गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे या महिन्याच्या अखेरीस लग्नबंधनात ...

क्रिकेट आणि बॉलिवूड विश्वातील जोडी म्हणजेच भारताचा स्टार गोलंदाज झहीर खान आणि अभिनेत्री सागरिका घाटगे या महिन्याच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार आहेत. २७ नोव्हेंबरला झहीर-सागरिकाचा विवाहसोहळा पार पडणार असून दोघेही सहजीवनाच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत.मुंबईतील ताज महाल पॅलेस अँड टॉवर येथे मोठ्या थाटामाटात हा लग्नसोहळा पार पडणार आहे. सागरिकाची मैत्रीण आणि ‘चक दे इंडिया’ चित्रपटातील तिची सहकलाकार विद्या मालवदेने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इन्स्टा-स्टोरीमध्ये झहीर-सागरिकाची लग्नपत्रिका शेअर केली आहे. पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या या पत्रिकेचे डिझाइन अत्यंत साधे असून त्यात कोणताही भडकपणा पाहायला मिळत नाहीये. विद्याच्या इन्स्टा-स्टोरीमध्ये सागरिकाचाही एक फोटो पाहायला मिळतो, ज्यामध्ये तिने लग्नाचे दागिने घातलेले दिसतात.लग्नानंतर मुंबई आणि पुणे अशा दोन ठिकाणी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. या ‘बिग फॅट वेडिंग’ची सर्व तयारी झाली असून आता सर्वांनाच या दिमाखदार लग्नसोहळ्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे.झहीर आणि सागरिकाने काही महिन्यांपूर्वी त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं होतं. त्याआधीपासूनच हे दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. क्रिकेटर युवराज सिंगच्या लग्नातही हे दोघं एकत्र पोहोचले होते.