Join us

​भूकंपाच्या धक्यातून युलिया सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 17:30 IST

मनाली येथे ‘ट्युबलाईट’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असलेल्या सलमान खानची चिंता रोमानिया मध्ये भूकंपाच्या धक्यामुळे वाढली होती. त्याची गर्लफ्रेंड युलिया ...

मनाली येथे ‘ट्युबलाईट’ या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त असलेल्या सलमान खानची चिंता रोमानिया मध्ये भूकंपाच्या धक्यामुळे वाढली होती. त्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर ही सध्या रोमानिया आहे. परंतु, ती यामध्ये सुरक्षीत असून, तिने इंस्टाग्रामवर भूकंप दरम्यानचा एक व्हीडीओ शेअर केला आहे. रोमानियामध्ये भूकंपाच्या धक्याची तीव्रता ही कमी होती. त्यामुळे मी सुरक्षीत असल्याचीही माहिती तिने या व्हीडीओसोबत  माहिती दिली आहे. भूकंपातून युलिया ही सुरक्षीत आहे व सलमान कबीर खान दिग्दर्शित ट्युबलाईट च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. यानंतर तो आपला आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’ ची शुटींग सुरु करीत आहे. त्यामध्ये तो आपल्या एक्स गर्लफे्रंड कॅटरीना कैफसोबत रोमांस करताना दिसणार आहे.