Join us
Daily Top 2Weekly Top 5

YouTube Vs TikTok Roast ! टिक टॉक स्टार आमिर विरोधात पोलीस तक्रार दाखल, युट्यूबर कॅरी मिनाटीला मिळतोय जबरदस्त सपोर्ट   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 13:12 IST

आमिर सिद्दीकी आणि कॅरी मिनाटी (अजय नागर) यांच्यातील महायुद्ध मिटण्याऐवजी वाढतच चालला आहे.

टिक टॉक व्हर्सेस युट्यूबवरील वाद काही थांबायचे नाव घेतच नाही आहे. आमिर सिद्दीकी आणि कॅरी मिनाटी (अजय नागर) यांच्यातील महायुद्ध मिटण्याऐवजी वाढतच चालला आहे. या वादात आता युट्यूब आणि टिक टॉकच्या मोठ्या स्टार्सदेखील सामील झाले आहेत. आता कास्टिंग डिरेक्टर नूर सिद्दीकीने या प्रकरणी आमीरच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

नूर सिद्दीकी आदी टिक टॉक स्टार्सना घेऊन एक रिएलिटी शो करणार होता पण आमिर व कॅरी मिनाटी यांच्या वादानंतर आता हा रिएलिटी शो येण्याची शक्यता कमी आहे. नूरच्या वकिलांनी सांगितले की आमिरच्या विरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात मानहानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दुसरीकडे कॅरी मिनाटीचा व्हिडिओदेखील युट्यूबने काढून टाकला आहे. यानंतर या वादात कित्येक प्रसिद्ध युट्यूबर्स कॅरी मिनाटीच्या सपोर्टमध्ये पुढे सरसावले आहेत.

युट्यूबर हिंदुस्तानी भाऊ, टेक्निकल गुरूजी (गौरव चौधरी), हर्ष बेनीवाल आणि भुवन बाम यांनी कॅरी मिनाटीला समर्थन केले आहे.

या महायुद्धाची सुरुवात कशी झाली तर सर्वप्रथम आमिर सिद्दीकीने एक व्हिडीओ शेअर केला. यात त्याने सर्व युट्यूबर्सची खिल्ली उडवली. आम्ही टिक टॉक स्टार युट्यूबर्सपेक्षा कसे श्रेष्ठ हे त्याने या व्हिडीओत छातीठोकपणे सांगितले. हा व्हिडीओ कॅरी मिनाटीने पाहिला आणि त्याला राहावले नाही. मग काय, कॅरीने आमिरची अशी काही खिल्ली उडवली की, त्याचा व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला होता.

टॅग्स :टिक-टॉकयु ट्यूब