Join us
Daily Top 2Weekly Top 5

संपत्तीच्या बाबतीत पती धर्मेंद्र यांनाही मागे टाकतात हेमा मालिनी,आकडा वाचून तुम्हीही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 15:09 IST

लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्यातली केमिस्ट्री पडद्यावर आणखी खुलू लागली. 'अलीबाबा और चालीस चोर', 'सम्राट', 'रझिया सुल्तान', या सिनेमात दोघांच्या जोडीला रसिकांनी डोक्यावर घेतलं.

रियल लाइफमध्ये धरमपाजींची ड्रीमगर्ल बनल्यानंतरही हेमामालिनी यांनी सिनेमात काम करणं सोडलं नाही... लग्नानंतर धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांच्यातली केमिस्ट्री पडद्यावर आणखी खुलू लागली. 'अलीबाबा और चालीस चोर', 'सम्राट', 'रझिया सुल्तान', या सिनेमात दोघांच्या जोडीला रसिकांनी डोक्यावर घेतलं. लग्नानंतर अभिनेत्रींच्या करिअरला उतरती कळा लागते असे बोलले जायचे मात्र हेमामालिनी यांच्या बाबतीत असे काही झाले नाही. लग्नाआधीही त्या यशाच्या शिखरावर होत्या. लग्नानंतरही त्यांची जादू कमी झाली नाही. 

निर्मात्यांनाही हेमा मालिनीने त्यांच्यासोबत काम करावे अशी ईच्छा असायची. त्यामुळे फक्त धर्मेंद्रच नाही तर त्या जमान्याच्या सुपरस्टार्ससोबतही ड्रीमगर्लची जोडी जमली. तसेच हेमा मालिनी यांना मिळणारे मानधनही इतर अभिनेत्रींच्या तुलनेत फार जास्त होते. त्यामुळे बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींच्या यादीत हेमा मालिनी यांचे नाव गणले जाते.  रिअल लाइफमध्ये  ड्रिमगर्ल हेमा मालिनी अतिशय आलिशान आयुष्य जगतात.

हेमा मालिनी आजही त्यांच्या संपत्तीच्याबाबती धर्मेंद्र काय तर इतर अभिनेत्यांनाही टक्कर देतात. राजकारणात प्रवेश केला त्यावेळी त्यांच्या संपत्तीचाही त्यांनी खुलासा केला होता. वयाच्या ७५ व्या वर्षीही त्या तितक्याच फिट आणि सुंदर दिसतात. सिनेमापासून दूर असल्या तरी इतर कार्यकम्रांमधून त्यांचे दर्शन चाहत्यांना घडत असते.

हेमा मालिनी जवळपास १५० कोटींहून अधिक संपत्तीच्या मालकीण आहेत. हेमा यांच्याकडे एक नाही दोन नाही तर चार बंगल्यांच्या मालकीण आहेत. बंगल्यांची किंमत देखील ९० कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. त्यांना दागिण्यांची देखील जास्त आवड आहे. १३ कोटींहून अधिक किंमतीचे दागिणे त्यांच्याकडे आहेत. इतकेच काय तर महागड्या गाड्यांचेही त्यांच्याकडे कलेक्शन आहे. पाच लक्झरियस गाड्या त्यांच्याकडे आहेत. या गाड्यांची किंमतही २ कोटींक्षा जास्त आहे. ड्रिमगर्ल हेमा मालिनी यांच्या संपत्तीचा आकडा पाहता पती धर्मेंद्र यांनाही त्या याबाबतीत मागे टाकतात.  

टॅग्स :हेमा मालिनीधमेंद्र