तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण दीपिका पादुकोणचे शिक्षण झाले आहे केवळ येवढेच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 16:23 IST
ओम शांती ओम या चित्रपटामुळे दीपिका पादुकोण प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. तिच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या ...
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण दीपिका पादुकोणचे शिक्षण झाले आहे केवळ येवढेच...
ओम शांती ओम या चित्रपटामुळे दीपिका पादुकोण प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. तिच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले. या चित्रपटाच्या आधी ती एक मॉडेल म्हणून प्रचंड प्रसिद्ध होती. ती वयाच्या सोळाव्या-सतराव्या वर्षापासून मॉडलिंगक्षेत्रात कार्यरत होती. खूपच कमी वयात या क्षेत्रात आल्याने दीपिकाला तिचे शिक्षण पूर्ण करता आले नाही.आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये दीपिकाचा समावेश होतो. तिच्या गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ओम शांती ओम या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर घेतले होते तर तिच्या पद्मावती या आगामी चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. आज सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री अशी दीपिका पादुकोणची ओळख आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, दीपिकाचे शिक्षण खूपच कमी झाले आहे. दीपिका किती शिकली आहे हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. दीपिका केवळ बारावी झाली असून ती कधी कॉलेजला गेलीच नाही. याविषयी दीपिकानेच स्वतः खुलासा केला आहे. हेमा मालिनीच्या आयुष्यावर आधारित हेमा मालिनीः बियोंड द ड्रीम गर्ल हे पुस्तक नुकतेच रसिकांच्या भेटीस आले आहे. या पुस्तकाच्या लाँचप्रसंगी दीपिका आली होती. त्यावेळी तिने ही गोष्ट सगळ्यांना सांगितली. दीपिका सांगते, मी माझी अकरावी-बारावी कशीबशी केली आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल. पण मी कधीच कॉलेजमध्ये गेली नाहीये. बारावीला असेपर्यंतच मी प्रसिद्ध मॉडेल बनले होते. मी त्यावेळी बेंगलुरू मध्ये राहात होते. तर माझे सगळे मॉडलिंग असाइनमेंट हे मुंबईत आणि दिल्लीत असायचे. त्यामुळे मला अनेकवेळा मुंबई आणि दिल्लीला जावे लागत असे. त्यामुळे कॉलेजला जायला मला कधी वेळच मिळाला नाही. पण बारावीनंतर मी डिग्रीच्या पहिल्या वर्षांला प्रवेश घेतला होता. पुढचे शिक्षण कॉलेजमध्ये जाऊन करायचे असे मी ठरवले होते. पण माझ्या व्यग्र शेड्युलमुळे मला ते शक्य झाले नाही. मी केवळ बारावी पास आहे. Also Read : आणि दीपिका पादुकोणला आठवला आयुष्यातील 'तो' क्षण