तुम्ही काही करू नका; केवळ गप्पा मारा! शबाना आझमी यांनी अमिताभ बच्चन यांना दिले उत्तर !!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 15:48 IST
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. सोशल मुद्यांपासून, स्वत:च्या पर्सनल लाईफबद्दलचे अपडेट्स ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ...
तुम्ही काही करू नका; केवळ गप्पा मारा! शबाना आझमी यांनी अमिताभ बच्चन यांना दिले उत्तर !!
बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. सोशल मुद्यांपासून, स्वत:च्या पर्सनल लाईफबद्दलचे अपडेट्स ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतात. आपल्या ताज्या tweetमध्ये अमिताभ यांनी कसले अपडेट्स दिले असेल? काही अंदाज? अहो, काम लवकरच संपल्याचे. होय, अचानक काम लवकरच संपले की, पुढे काय करावे, ते कळत नाही. twitter आणि एफबी जिंदाबाद, असे tweetत्यांनी केले. त्यांच्या या संभमावर अनेकांनी मनात येईल तसे उत्तर दिले. पण यात सगळ्यांत एका अभिनेत्रीच्या उत्तराने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधले. ही अभिनेत्री कोण ? तर शबाना आझमी. होय, शबाना यांनी अमिताभ यांना चांगलेच मजेशीर उत्तर दिले. ‘वर्कोहॉलिक माणसा! तुम्ही काही करू नका; फक्त डोकं खाजवा आणि गप्पा मारा, असे tweet शबाना यांनी केले. अर्थात हे tweet खोचक नव्हते तर अमिताभ यांची जरा गंमत करणारे होते. पण तरिही शबाना यांचा हा सल्ला अमिताभ किती मनावर घेतात, ते आपण बघूच.शबाना व अमिताभ हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांनीही ‘परवरिश’ आणि ‘अमर अकबर अॅन्थनी’ या सिनेमांत एकत्र काम केले आहे.अमिताभ सध्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये बिझी आहेत. लवकरच ते सलमान खानसोबत ‘रेस ३’ मध्ये दिसणार असल्याचीही खबर आहे. अमिताभ आणि सलमान यांनी याआधी ‘बागबान’ आणि ‘बाबुल’ सिनेमातही एकत्र काम केलेले. या सिनेमाशिवाय नागराज मंजुळे यांच्या पहिल्या हिंदी सिनेमात ते काम करणार आहेत. नागराज यांच्या या सिनेमाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.