Join us

यो यो हनी सिंगचे 'मखना' गाणं सुपरहिट, ही आहे गाण्याची खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 14:02 IST

हनी सिंगच्या 'मखना' गाण्याला महिनाभरात 100 मिलियन लोकांनी बघितले आहे. या गाण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हनी सिंग त्याच्या फॅन्साच्या भेटीला आलायं.

ठळक मुद्देमखना गाण्याला त्याच्या फॅन्सनी ही चांगलेच डोक्यावर घेतले

हनी सिंगच्या 'मखना' गाण्याला महिनाभरात 100 मिलियन लोकांनी बघितले आहे. या गाण्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हनी सिंग त्याच्या फॅन्साच्या भेटीला आला. या गाण्याला त्याच्या फॅन्सनी ही चांगलेच डोक्यावर घेतले. सोशल मीडियावर या गाण्याला चांगलीच लोकप्रियता मिळून व्हायरल झाले आहे,  या गाण्याबाबत बोलताना हनी सिंग म्हणाला, ''मखना गाण्याचे शूटिंग हा माझ्यासाठी रोमांचकरी अनुभव होता. या गाण्याला तयार करण्यासाठी मला जवळपास सात महिन्यांचा वेळ लागला. या गाण्याच्या माध्यामातून मला नवीन तरुण टॅलेंट मिळाले.'' गतवर्षी आलेल्या दिल चोरी और छोटे छोटे पेग, दिस पार्टी इज ओवर नाउ, रंगतारी या गाण्याना रसिकांनी डोक्यावर घेतले.

हनी सिंग  बॉलिवूडमधून काही काळ मी गायब होतो. यावर हनी सिंग म्हणाला होता,  बायपोलर डिसआॅर्डरशी माझी झुंज सुरू होती असे त्यांने सांगितले होते, . यादरम्यान मी चार डॉक्टर बदलले. औषधांचा माझ्यावर कुठलाही परिणाम होत नव्हता. मी अक्षरश: वेडा झालो होतो. ते १८ महिने माझ्या आयुष्यातील सगळ्यात कठीण दिवस होते. मी रिहॅब सेंटरमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण मी नोएडातील माझ्या घरी होतो, असे हनीने या मुलाखतीत कबूल केले होते.

टॅग्स :हनी सिंह