Join us

कधी मानसिक आजाराचा शिकार झाला होता हनी सिंग, दारूमुळे झाली होती अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 17:06 IST

एक वेळ असा होता की मी यातून कधीच बाहेर पडणार नाही.

 रॅपर हनी सिंगचा जन्म 1 मार्च 1983 ला पंजाबच्या होशियारपूर येथे झाला. फार कमी लोकांना माहिती आहे की हनी सिंगचे खरे नाव हिरदेश सिंह आहे. पण जेव्हा त्याने स्टेजवर परफॉर्म करायला सुरुवात केली  तेव्हा त्याने आपले नाव यो यो हनी सिंग ठेवले. हनी सिंगने आपल्या करिअरची सुरुवात यूट्यूब व्हिडिओने केली होती त्यानंतर तो एकरात्रीत स्टार झाला. 

हनीने यूकेमधील ट्रिनिटी शाळेतून संगीताचे शिक्षण घेतले. दिल्लीत आल्यानंतर त्याने रॅप करायला  सुरूवात केली. लोकांनी जेव्हा हनी सिंगचा रॅप ऐकले तेव्हा त्याचे लाखो चाहते झाले.त्याने आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत.

हनी सिंगने मुलाखतीत सांगितले होते की, 'बायपोलर डिसआर्डरच्या जवळपास १८ महिने पीडित होतो.' 'ते १८ महिने माझ्या जीवनातील सर्वात वाईट काळ होता. या काळात मी माझ्या नोएडातील घरात होतो. मी बायपोलर डिसऑर्डरने पीडित होतो. या आजारावर १८ महिने उपचार सुरू होते.' हनी म्हणाला की, 'मी बायपोलरच्या आजारासोबत दारूही पित होतो. ज्यामुळे माझी अवस्था आणखीन बिघडली.

' एक वेळ असा होता की मी यातून कधीच बाहेर पडणार नाही, असे हनीला वाटत होते. त्याच्यावर औषधांचादेखील फरक पडत नव्हता. त्याने पुढे सांगितले की, 'एका रात्री जेव्हा मी झोपेच्या गोळ्या खाल्यानंतरही झोपलो नाही. त्यावेळी मी राइज अँड शाइन नावाचे गाणे लिहिले आणि कंपोझ केले. हे सर्व पाहून माझी आई रडली होती. या कारणामुळेच मी आज त्या आजारातून बाहेर पडू शकलो.' 

टॅग्स :हनी सिंह