यो यो चाहत्यांना देणार सुखद धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 08:59 IST
आता यो यो आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का देण्यासाठी सज्ज आहे. अहो काय, म्हणून काय विचारता! तुमचा यो यो आता अॅक्शन हिरो म्हणून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
यो यो चाहत्यांना देणार सुखद धक्का
तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेला रॅपर यो यो हनी सिंग गेल्या बºयाच दिवसांपासून गायब होता. ड्रग्जचे व्यसन सोडवण्यासाठी यो यो पुनर्वसन केंद्रात भरती झाल्याच्या बातम्याही यादरम्यान पिकल्या होत्या. पण आता यो यो आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का देण्यासाठी सज्ज आहे. अहो काय, म्हणून काय विचारता! तुमचा यो यो आता अॅक्शन हिरो म्हणून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. होय, ‘झोरावर’ या पंजाबी चित्रपटातून यो यो डेब्यू करतो आहे. या चित्रपटात तो अगदी सुपरमॅन अॅक्शन करताना दिसणार आहे...आहे ना सुखद धक्का !!! पाहूया, या चित्रपटाचा टीझर...