Join us
Daily Top 2Weekly Top 5

​होय, शाहीदला करायचेयं करिनासोबत काम!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2016 21:52 IST

होय, ऐकतायं ते खरं आहे. शाहीद कपूर व त्याची एक्स गर्लफ्रेन्ड करिना कपूर  ‘उडता पंजाब’मध्ये एकत्र काम करताहेत. अर्थात ...

होय, ऐकतायं ते खरं आहे. शाहीद कपूर व त्याची एक्स गर्लफ्रेन्ड करिना कपूर  ‘उडता पंजाब’मध्ये एकत्र काम करताहेत. अर्थात यात दोघांची जोडी नाही. पण या दोघांची आॅनस्क्रीन जोडी पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. शाहीदला याबद्दल काय वाटते, असे विचारल्यावर शाहीद काय म्हणाला माहितीय...अहो, त्यानेही याला होकारच दिला. मी व करिना दोघे पुन्हा कधी एकत्र दिसू हे मला ठाऊक नाही. पण करिनासोबत पुन्हा काम करायला आवडेल का, हा प्रश्न किमान ३० वेळा विचारण्यात आला आणि दरवेळी मी हो, असेच उत्तर दिलेयं, असे शाहीद म्हणाला.करिनासोबत पुन्हा काम करायला मिळालेच तर मला आनंदच होईल आणि कदाचित नाहीच मिळाले तरीही मला काहीही प्रॉब्लेम नाही, असेही त्याने सांगितले. तूर्तास शाहीद आपल्या येणारा बेबी आणि पत्नी मीरा या दोघांची काळजी घेतोय. शिवाय ‘उडता पंजाब’चे प्रमोशनही करतोय. तेव्हा आॅल दी बेस्ट शाहीद!!