Join us

​होय, मी ४० वर्षांची..सुश्मिताने सांगितले खरे वय..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 20:39 IST

सुश्मिता सेन हिला तिचे खरे वय लपवण्यात काहीही स्वारस्य नाहीय. होय, आज सुश्मिताने सोशल मीडियावर तिचे खरे वय जाहिर केले. मी ४० वर्षांची आहे, असे तिने जाहिर करून टाकले.

बायकांचे वय विचारायचे नसते, असा अलिखित नियम आहे. त्यातल्या त्यात अभिनेत्रींचे वय तर अजिबात कळता कामा नये. आपले खरे वय कळू नये, म्हणून अनेक नट्या बराच खटाटोप करताना दिसतात. याचे ताजे उदाहरण म्हणजे आपली कंगना. सुश्मिता सेन हिला मात्र तिचे खरे वय लपवण्यात काहीही स्वारस्य नाहीय. होय, आज सुश्मिताने सोशल मीडियावर तिचे खरे वय जाहिर केले. मी ४० वर्षांची आहे, असे तिने जाहिर करून टाकले. अर्थात या पोस्टसोबत एक हॉट फोटो शेअर करायलाही ती विसरली नाही. सुश्मितापासून इतर नट्यांनी धडा घ्यायला हरकत नाही, होय ना??