Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदाच्या दिवाळीत मम्मी करिना कपूरने लाडक्या तैमूरसाठी केले खास प्लॅनिंग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 21:56 IST

यंदाच्या दिवाळीत मम्मी करिना कपूर खानने आपल्या लाडक्या तैमूरसाठी खास प्लॅन केले आहे. खरं तर करिना अशी अभिनेत्री आहे, ...

यंदाच्या दिवाळीत मम्मी करिना कपूर खानने आपल्या लाडक्या तैमूरसाठी खास प्लॅन केले आहे. खरं तर करिना अशी अभिनेत्री आहे, जे ठरविते ते पूर्ण केल्याशिवाय शांत बसत नाही. त्यामुळेच ती चित्रपटात काम करो न करो परंतु नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. मग ती झीरो साइज फिगरविषयीचे तिचे वक्तव्य असो वा गर्भावस्थेच्या अखेरपर्यंत काम करीत असल्याची चर्चा असो, यावर करिनाने नेहमीच बिंधास्तपणे तिची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खरं तर करिना जे काही ठरविते, त्याला तिचे वडील रणधीर कपूर आणि पती सैफ अली खान यांचा नेहमीच पाठिंबा असतो. आता असाच काहीसा निश्चिय करिनाने केला आहे. करिनाने नुकतेच माध्यमांशी बोलताना याविषयीचा खुलासा केला आहे, करिनाने यंदाच्या दिवाळीत तिच्या चिमुकल्या तैमूरसाठी काही खास प्लॅनिंग केले आहे. होय, करिनानेच याविषयीचा खुलासा केला आहे. तिने म्हटले की, ‘तैमूरची ही पहिलीच दिवाळी आहे. त्यामुळे यंदा मी त्याच्यासाठी गिफ्ट आणि मिठाई आणण्याबरोबरच त्याला एक सुंदरसा ट्रेडिशनल आउटफिट घालणार आहे. त्याला गोड खायला खूप आवडते. त्यामुळे मला खात्री आहे की, तो यंदाच्या दिवाळीत मिठाईची चांगलीच चव घेणार आहे. करिनाने म्हटले की, ‘माझ्यासाठी काम प्राथमिकता आहे, परंतु त्याचबरोबर परिवाराची काळजी अन् देखभालही तेवढीच महत्त्वाची आहे. त्यामुळे मी आणि सैफ दिवाळीअगोदरच आमचे काम आटोपून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. जेणेकरून आम्हाला त्याकाळात तैमूरला पूर्ण वेळ देता येईल. काल करिनाने तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्या बर्थ डेसाठी बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी तिच्या घरी जाऊन तिला शुभेच्छा दिल्या. सध्या करिना तिच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शूटिंगबरोबरच तिला तैमूरचीही काळजी घ्यावी लागत आहे.