Join us
Daily Top 2Weekly Top 5

यंदा बच्चन कुटुंबाकडे नसणार दिवाळी पार्टी! कारण आहे ऐश्वर्या राय बच्चन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 10:32 IST

बच्चन फॅमिली जितकी ग्रँड तितकीच या फॅमिलीची दिवाळीही ग्रँड. होय, दरवर्षी बच्चन कुटुंबाकडे दिवाळीची मोठ्ठी पार्टी होते. बॉलिवूडमधील सगळे ...

बच्चन फॅमिली जितकी ग्रँड तितकीच या फॅमिलीची दिवाळीही ग्रँड. होय, दरवर्षी बच्चन कुटुंबाकडे दिवाळीची मोठ्ठी पार्टी होते. बॉलिवूडमधील सगळे दिग्गज या पार्टीला पोहोचतात. गतवर्षीही बच्चन कुटुंबांकडे दिवाळीचे धम्माल सेलिब्रेशन झाले होते. या पार्टीचे इनसाईड फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यंदाही सगळ्यांचे लक्ष बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीकडे लागले आहेत.आत्तापर्यंत सलमान खान, शाहरूख खान, एकता कपूर अशा सगळ्यांकडे दिवाळी पार्टी झाली.  साहजिकच अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीची प्रतीक्षा वाढली. पण बच्चन कुटुंबाच्या  दिवाळी पार्टीसाठी आपल्याला पुढील वर्षीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण यंदा बच्चन कुटुंबाकडे कुठलीही दिवाळी पार्टी नसणार. होय, यंदा दिवाळी पार्टी न करण्याचा निर्णय बच्चन कुुटुंबाने घेतला आहे आणि यामागचे कारण आहे ऐश्वर्या राय. म्हणजेच बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन.होय,ऐश्वर्याचे वडिल कृष्णराज राय यांचे याचवर्षी मार्च महिन्यात निधन झाले. प्रथेनुसार, राय कुटुंबाच्या दु:खात सहभागी होत बच्चन कुटुंबाने  यंदा वर्षभर कुठलेही सण साजरे न करण्याचा निर्णय घेतला आहे. याचमुळे बच्चन कुटुंबाच्या घरी यंदा दिवाळी सेलिब्रेशन नसणार आहे. दिवाळी पार्टीऐवजी बच्चन कुटुंब एकमेकांसोबत वेळ घालवेल.अलीकडे अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाची पार्टीही बच्चन कुुटुंबाने टाळली. अमिताभ यांच्या वाढदिवसाची पार्टी देण्याऐवजी अख्खा कुटुंबाने मालदीव येथे बिग बींचा वाढदिवस साजरा केला.  ALSO READ: see pics : ​वडिलांना अखेरचा निरोप देताना ऐश्वर्या रायला अश्रू अनावर!ऐश्वर्याचे वडिल कृष्णराज कर्करोगाने पीडित होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. पण मृत्यूच्या काही महिने आधी त्यांचा कर्करोग पलटून आला होता. त्यामुळे त्यांना  लीलावती रूग्णालयात त्यांना भरती करण्यात आले होते. याच रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. मीडियातील बातम्या मानाल तर, कृष्णराज यांना लिंफोमा कॅन्सरने ग्रासले होते. हा कॅन्सर त्यांच्या ब्रेनपर्यंत पोहोचला होता.a