यशराज फिल्म्सचा 'सैयारा' (Saiyaara Movie) हा चित्रपट जागतिक स्तरावर गाजलेली एक सुंदर लव्हस्टोरी ठरली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या लव्हस्टोरी चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाने आपले नाव कोरले आहे. अहान पांडे (Ahan Pandey) आणि अनीत पड्डा (Aneet Padda) यांचा 'सैयारा' आता १२ सप्टेंबरला ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. ओटीटी रिलीजपूर्वीच, निर्मात्यांनी चाहत्यांना एक नवीन सरप्राइज दिले आहे. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच सुंदर असलेली दोन नवीन गाणी त्यांनी रिलीज केली आहेत.
मोहित सूरी दिग्दर्शित 'सैयारा' या चित्रपटाने दोन नवीन कलाकार अहान पांडे आणि अनीत पड्डा यांना लाँच केले. त्यांच्या अभिनयाने संपूर्ण देशाला वेड लावले आणि आज ते जनरेशन जेन झीचे नवे सुपरस्टार बनले आहेत. 'सैयारा'ची कथा जितकी लोकांच्या मनाला भिडली, तितकीच त्याची गाणीही आवडली. या चित्रपटाच्या संगीत अल्बमनेही अनेक रेकॉर्ड मोडले. अलीकडच्या काळात कोणत्याही भारतीय अल्बमला इतकं प्रेम मिळालं नसावं. आता चाहत्यांचे अफाट प्रेम पाहून, यशराज फिल्म्स म्युझिकने एक्सटेंडेड अल्बम रिलीज केला आहे, ज्यात दोन नवीन गाण्यांचा समावेश आहे.
दोन नवीन गाणी भेटीला'सैयारा'च्या या दोन नवीन गाण्यांमध्ये ‘बर्बाद-रॉक व्हर्जन’ आणि ‘साथ तू चल हमसफर’ यांचा समावेश आहे. यापूर्वी रिलीज झालेल्या सात गाण्यांनी आधीच खूप लोकप्रियता मिळवली आहे. हे दोन नवीन ट्रॅक 'सैयारा'सारख्या रोमँटिक चित्रपटाला दीर्घकाळ स्मरणात ठेवण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी बनवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
'सैयारा' कधी आणि कुठे पाहता येईल?१८ जुलै, २०२५ रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेला 'सैयारा' ज्यांना पाहता आला नाही, ते आता नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्याचा आनंद घेऊ शकतात.