Join us
Daily Top 2Weekly Top 5

Yash Chora Birthday : ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात वेडे होते ‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 11:42 IST

Yash Chora Birthday : बॉलिवूडचे किंग ऑफ रोमान्स यश चोप्रा यांचा आज वाढदिवस. आज यश चोप्रा आपल्यात नाहीत. 21 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांचे निधन झाले.

ठळक मुद्देयशजींच्या पत्नीचे नाव पामेला चोप्रा आहे. त्यांना दोन मुले असून आदित्य आणि उदय ही त्यांची नावे आहेत.

बॉलिवूडचे किंग ऑफ रोमान्स यश चोप्रा यांचा आज वाढदिवस. आज यश चोप्रा आपल्यात नाहीत. 21 ऑक्टोबर 2012 रोजी त्यांचे निधन झाले. यश चोप्रा यांनी अनेक रोमॅन्टिक चित्रपट बनवलेत. सोबतच आपल्या सिनेमातून अनेकांना स्टारडम मिळवून दिले. अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले, याचे श्रेय निश्चितपणे यश चोप्रा यांना जाते.

बॉलिवूडला सदाबहार प्रेमकथांचा नजराना देणारे हेच यश चोप्रा बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात अक्षरश: वेडे होते. होय, ही अभिनेत्री कोण तर मुमताज.मुमताज यश चोप्रांच्या प्रेमात होती, तसेच यश चोप्रा हेही मुमताजच्या प्रेमात आकंठ बुडाले होते.  इतके की, ‘आदमी और इंसान’ या चित्रपटात कॅमेराचा संपूर्ण फोकस मुमताजवर राहावा यासाठी  त्यांनी प्रचंड खटाटोप केला होता.

खरे सायरा बानो या चित्रपटात लीड हिरोईन होती आणि मुमताज साईड हिरोईन. पण यश यांनी मुमताज यांचा रोल वाढवून दिला. इतकेच नाही तर त्यांच्यावर एक खास गाणेही चित्रीत केले. म्हणायला सायरा लीड हिरोईन होती. पण यश यांनी मुमताज यांना असे काही फोकस केले की, तीच लीड हिरोईन बनली. यानंतर मुमताज-यश यांचे प्रेम आणखीच बहरले. 

असे म्हणतात की, दोघेही लग्न करणार होते. कारण त्यावेळी दोघेही सिंगल होते. दोघांचे प्रेम पाहून यश चोप्रांचे मोठे बंधू बी. आर. चोप्रा मुमताजच्या घरी लग्नाची बोलणी करायला गेले. पण मुमताजच्या कुटुंबाने या लग्नाला नकार दिला. करिअर सोडून मुमताजने घर सांभाळावे, यास तिच्या घरच्यांचा विरोध होता. मग काय, याचसोबत यश व मुमताज यांचे नाते संपुष्टात आले. यानंतर यश यांनी पामेला सिंगसोबत लग्न केले आणि आपल्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले.

यशजींच्या पत्नीचे नाव पामेला चोप्रा आहे. त्यांना दोन मुले असून आदित्य आणि उदय ही त्यांची नावे आहेत. त्यांचा थोरला मुलगा आदित्य दिग्दर्शक आणि निर्माता आहे. त्याचे अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत लग्न झाले. तर छोटा मुलगा उदय चोप्रा बॉलिवूड अभिनेता आहे.

टॅग्स :यश चोप्रामुमताज