बॉलिवूड अभिनेत्रीयामी गौतम सध्या तिचा पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धरच्या आगामी 'धुरंधर २' या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. 'धुरंधर'च्या प्रचंड यशानंतर आदित्य धर आता 'धुरंधर'चा सीक्वल घेऊन येत आहेत. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असतानाच, यामी गौतमने हा चित्रपट पाहिल्यानंतर तिचा अनुभव कसा होता, याचा खुलासा केला आहे.
'धुरंधर २' पाहून यामी गौतम काय म्हणाली?
न्यूज 18 राइजिंग भारत समिटमध्ये यामी सहभागी झाली होती. यावेळी तिने 'धुरंधर २' आधीच पाहिला असल्याचा खुलासा केला. यामी म्हणाली, “मी 'धुरंधर २' आधीच पाहिली आहे आणि ती अतिशय थक्क करणारी फिल्म आहे. चित्रपट पाहिल्यानंतर मी खूप भावुक झाले होते. मला त्याच दिवशी फ्लाईट पकडायची होती, त्यामुळे मी त्यावेळी आदित्यशी काहीच बोलू शकले नाही. पण 'धुरंधर २' पाहिल्यानंतर मात्र मी दुसरीकडे कशावरच लक्ष केंद्रित करू शकले नाही. मला एक स्क्रिप्ट वाचायची होती, पण ती मी वाचू शकले नाही; मला काहीतरी पाहायचं होते, पण मी पाहू शकले नाही.''
''मी फक्त विमानाच्या खिडकीतून बाहेरचा सुंदर सूर्यास्त पाहत विचार करत होते की, जेव्हा फ्लाईट लँड होईल तेव्हा मी आदित्यला काय सांगू? मला चित्रपटाबद्दल आणि तो पाहताना मी जे काही अनुभवलं, त्याबद्दलच्या माझ्या भावना शब्दांत मांडायच्या होत्या. आदित्यचे आपल्या प्रेक्षकांवर आणि देशावर खूप प्रेम आहे आणि हा चित्रपट साकारण्यासाठी त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे. 'धुरंधर २' हा प्रेक्षकांसाठी एक असा अनुभव असेल, जो ते कधीच विसरू शकणार नाहीत.” यामीने केलेल्या या वक्तव्यामुळे 'धुरंधर २' पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Web Summary : Yami Gautam, wife of director Aditya Dhar, was deeply moved by 'Dhurandar 2'. She struggled to articulate her feelings to Aditya after watching the film, overwhelmed by its impact and his dedication.
Web Summary : निर्देशक आदित्य धर की पत्नी यामी गौतम 'धुरंधर 2' से बहुत प्रभावित हुईं। फिल्म देखने के बाद वह इसके प्रभाव और उनके समर्पण से अभिभूत होकर आदित्य को अपनी भावनाएं व्यक्त करने के लिए संघर्ष करती रहीं।