Join us
Daily Top 2Weekly Top 5

यामी गौतमनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, काय आहे खास?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 17:59 IST

अभिनेत्री यामी गौतमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

अभिनेत्री यामी गौतमच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एकीकडे तिचा पती आणि प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य धर याचा 'धुरंधर २' बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कमाई करतोय. तर दुसरीकडे यामी आता एका हटके विषयावर आधारित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. कोर्टरूम ड्रामा आणि स्पाय थ्रिलरनंतर यामी 'हॉरर-कॉमेडी' या लोकप्रिय जॉनरमध्ये पाहायला मिळणार आहे.

यामी गौतम लवकरच 'नयी नवेली' या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओच्या एका विशेष कार्यक्रमादरम्यान या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल. राय करत असून दिग्दर्शन बालाजी मोहन करणार आहेत. विशेष म्हणजे, हा चित्रपट भारतीय पौराणिक कथा आणि विनोदाचे एक रंजक मिश्रण असणार आहे.

'हक' नंतर यामीचा धमाकानोव्हेंबर २०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हक' या चित्रपटात यामीने साकारलेल्या 'शाह बानो'च्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते. चित्रपटगृहांनंतर ओटीटीवरही या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता 'नयी नवेली'च्या माध्यमातून यामी पुन्हा एकदा आपला ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटाची पटकथा दिव्या निधी शर्मा यांनी लिहिली आहे, ज्यांनी 'सितारे जमीन पर' आणि 'हीरामंडी' सारख्या मोठ्या प्रकल्पांसाठी काम केले आहे.

OTT रिलीज आणि थिएटर प्रदर्शनमिळालेल्या माहितीनुसार, 'नयी नवेली' चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन काम सध्या वेगाने सुरू आहे. हा चित्रपट आधी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल आणि त्यानंतर तो अमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केला जाईल. प्रदर्शनाची तारीख अद्याप गुलदस्त्यात असली तरी, यामीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Yami Gautam Announces New Film: A Horror-Comedy 'Nayi Naveli'

Web Summary : Yami Gautam's 'Nayi Naveli', a horror-comedy produced by Anand L. Rai, is set to release after her acclaimed performance in 'Haq'. The film, blending Indian mythology and humor, will first hit theaters then stream on Amazon Prime Video.
टॅग्स :यामी गौतमबॉलिवूड