Join us

पुलकितची Ex-wife श्वेताच्या आरोपावर यामीने दिले हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 16:58 IST

पुलकित सम्राट आणि यामी गौतम यांच्यातील अफेअरच्या बातम्या चर्चेत असताना पुलकितची पत्नी श्वेता रोहिरा हिने यामीवर बेछूट आरोप केले ...

पुलकित सम्राट आणि यामी गौतम यांच्यातील अफेअरच्या बातम्या चर्चेत असताना पुलकितची पत्नी श्वेता रोहिरा हिने यामीवर बेछूट आरोप केले आहेत. माझ्या व पुलकितच्या घटस्फोटासाठी यामीच जबाबदार आहे. तिनेच माझा संसार तोडला, असा श्वेताचा आरोप आहे. मुंबईत माझ्या आईच्या बिल्डिंगमध्येच यामी राहात होती. मी आणि पुलकित अनेकवेळा माझ्या आईकडे जात असे. त्यावेळी यामी आम्हाला भेटायला येत असे. ती माझ्या कुत्र्यासोबतही खेळत असे. तिने आणि पुलकितने काही वर्षांपूर्वी एका म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले होते. तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. ‘सनम रे’ आणि ‘जुनिनियत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने यामी आणि पुलकितत दोघे जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायला लागले. श्वेतामुळेच माझे लग्न मोडले. ती पुलकितच्या आयुष्यात यायच्या आधी आमच्यात सगळे काही आलबेल होते. त्यामुळे आमच्या घटस्फोटासाठी यामीच जबाबदार आहे, असा आरोप अलीकडे एका मुलाखतीदरम्यान श्वेताने केलायं. आता श्वेताच्या या आरोपावर यामी काय उत्तर देते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आज एका इव्हेंटमध्ये पत्रकारांनी  श्वेताच्या या आरोपाबाबत यामीला विचारले. पण यामीने या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. ‘मी इतक्या सुंदर इव्हेंटला आले असताना असे मूर्खपणाचे प्रश्न मला का विचारत आहात. तसेही मी या प्रश्नांचे उत्तर द्यायला आलेली नाही. मी इथे केवळ इव्हेंटबद्दलच बोलणार..’असे अगदी शांतपणे आणि हसतहसत यामीने सांगितले. वेल, यामी..आत्ता हा प्रश्न तू टाळला असला तरी, तुला यावर उत्तर तर द्यावेच लागणार!!