Join us
Daily Top 2Weekly Top 5

​यामी पुलकीतला सोडणार??

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2016 21:55 IST

मोस्ट ब्युटिफुल यामी गौतम आणि पुलकीत सम्राट यांच्यातील रोमान्सच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. पण आता या दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या ...

मोस्ट ब्युटिफुल यामी गौतम आणि पुलकीत सम्राट यांच्यातील रोमान्सच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. पण आता या दोघांच्याही वाटा वेगवेगळ्या होण्याची शक्यता आहे. होय, एका आॅनलाईन पोर्टलने दिलेल्या बातमीनुसार, यामी व पुलकीत यांच्यात गत काही दिवसांत चांगलेच बिनसले आहे. याचा परिणाम म्हणजे यामीने पुलकीतपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामीचे करिअर सध्या चांगलेच मार्गी लागले आहे. लवकरच ती ‘काबील’मध्ये हृतिक रोशनसोबत दिसणार आहे. अशास्थितीत पुलकीतसोबतच्या रिलेशनशिपमुळे करिअरचे नुकसान व्हायला नको, असे यामीला वाटतेय. पुलकीत निव्वळ तिच्या सक्सेसचा स्वत:साठी वापर करून घेतोय, असे अलीकडे यामीला वाटू लागले आहे. कारण अद्यापही पुलकीतने त्याची पत्नी श्वेता रोहिरा हिला घटस्फोट दिलेला नाही.  सध्या तरी पुलकितसोबतचे रिलेशन याच टप्प्यावर थांबवावे, या निर्णयाप्रत यामी आली आहे. आता यापुढे पुलकीत यामीची समजूत काढतो वा नाही? यामी त्याला दुसरी संधी देते वा नाही? हे केवळ येणारा वेळच सांगेल..तूर्तास तरी यामी आपल्या निर्णयावर ठाप आहे. पुढे बघूयात!!