Join us

यामीची शाश्वती नव्हती -दिव्या खोसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 08:20 IST

 ‘सनम रे’ दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार म्हणते की,‘ चित्रपटाचे कास्टिंग ठरवताना माझ्या काही शंका होत्या. यामीने दरम्यान वजन घटवले ...

 ‘सनम रे’ दिग्दर्शक दिव्या खोसला कुमार म्हणते की,‘ चित्रपटाचे कास्टिंग ठरवताना माझ्या काही शंका होत्या. यामीने दरम्यान वजन घटवले आणि काही वर्कशॉप्समुळे मला यामी गौतमला चित्रपटासाठी घ्यावे लागले. पाच ते सहा महिने मला लागले यासाठी की मला यामीला चित्रपटात घ्यायचे आहे. सौंदर्य कसे दिसेल आणि मी यात यामीला कसे दाखवणार आहे हे मला ठरवायला खुप वेळ लागला. मी वर्कशॉप्स घेतले, पाच ते सहा महिन्यांनंतर मी यामीला निश्चित केले. यामी भूमिकेत परफेक्ट बसते, हे मला नंतर कळाले. यामी आणि पुल्कित यांची केमिस्ट्री पाहता मला चित्रपटासाठी परफेक्ट जोडी मिळाल्याचे समाधान मिळाले. पुल्कितची केमिस्ट्री यामीसोबत जास्त लोकांना आवडली. यातच खरं चित्रपटाचे यश आहे.’